Photos: चेंगराचेंगरी थोडक्यात टळल्यानंतर पंढरपूर मंदिर प्रशासनाला जाग; नक्की घडलं काय?

Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Stampede Like Situation: पंढरपूरमध्ये दिवसोंदिवस भाविकांच्या वाढत जाणाऱ्या गर्दीमागील कारण आहे अवघ्या काही दिवसांवर आलेली आषाढी एकादशी! मात्र एकादशीपूर्वी पंढरपूरच्या मंदिराबाहेर एक फारच विचित्र घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. नेमकं घडलं काय आणि प्रशासनाने काय केलं आहे पाहूयात...

| Jun 26, 2024, 12:48 PM IST
1/7

Pandharpur Stampede Like Situation

आषाढी एकादशीच्या (Ashadhi ekadashi 2024) वारीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. बुधवारी (26 जून 2024 रोजी) पहाटेपासूनच विठ्ठल- रखुमाईच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या दर्शन रांगेमध्ये उभे होते. सकाळच्या सुमारास या दर्शन रांगेमध्ये काही ठिकाणी बॅरिगेटिंग नसल्यामुळे भाविकांची गर्दी वाढल्याने रांगेच चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

2/7

Pandharpur Stampede Like Situation

मंदिर समितीचा एकही सुरक्षारक्षक रांगेला शिस्त लावण्यासाठी किंवा ती नियंत्रित करण्यासाठी मंदिराच्या बाहेरील बाजूस उपस्थित नव्हता. त्यामुळे या ठिकाणी गर्दीच्या या वातावरणात भाविकांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं.

3/7

Pandharpur Stampede Like Situation

एकीकडे मंदिर समिती नव्या नव्या घोषणा करत असताना प्रत्यक्षात मात्र  परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे या प्रसंगामुळं समोर आलं आणि मंदिर प्रशासनाला खडबडून जाग आली.   

4/7

Pandharpur Stampede Like Situation

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दर्शन रांगेत तातडीने बॅरिकेटिंग व्यवस्था करण्यात आली आहे.  

5/7

Pandharpur Stampede Like Situation

मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकांनी रांगेला शिस्त लावल्याचं दिसून आलं आहे. या प्रकरणाची बातमी 'झी 24 तास'ने दाखवल्यानंतर रांगेला शिस्त लावून भाविकांना दर्शनासाठी सोडलं जात होतं.  

6/7

Pandharpur Stampede Like Situation

रस्त्याच्या खोदकामामुळे दर्शन रांगेत हा गोंधळ उडाला होता.

7/7

Pandharpur Stampede Like Situation

आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त काही संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवलं आहे, तर पुढील तीन ते चार दिवसांमध्ये मानाच्या आणि मोठ्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहेत. मात्र त्यापूर्वी ही संभाव्य दुर्घटना कानावरुन गेल्याची चर्चा सध्या आहे. या प्रकरणानंतर तरी प्रशासन आता वारीनिमित्त पूर्णपणे सजग राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.