श्वेता तिवारीनं 'या' अभिनेत्यासोबतचे फोटो होतायत व्हायरल

Shweta Tiwari With This Actor : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीला सुंदरतेमध्ये आजही कोणी मागे टाकू शकत नाही. लेक पलकसोबत श्वेताला पाहता त्या बहिणी आहेत असं अनेकदा लोक बोलताना दिसतात. श्वेता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या श्वेतानं नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. 

| Jun 26, 2024, 18:56 PM IST
1/7

श्वेता तिवारीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये 'बिग बॉस 13' मधील एका स्पर्धकासोबत दिसत आहेत. हा स्पर्धक कोणी दुसरा नाही तर विशाल सिंग आहे. 

2/7

श्वेता आणि विशाल मस्ती करताना दिसतायत. विशालसोबत श्वेता आनंदी असल्याचं दिसतंय.   

3/7

श्वेता आणि विशाल दोघांनी कॅज्युअर आउटफिट परिधान केलं आहे. दोघांनी एकत्र पोज देऊन फोटो देखील क्लिक केले आहेत. तर त्या दोघांचं बॉन्ड यात दिसत आहे. 

4/7

विशालसोबत सेल्फी शेअर करत श्वेतानं त्याला 'बबुआ' हे कॅप्शन दिलं आहे.

5/7

विशाल आणि श्वेताचा हे फोटो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. 

6/7

श्वेता आणि विशालनं बेगुसराय या मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यात आधी श्वेतानं त्याच्या वहिणीची भूमिका साकारली होती आणि जेव्हा लीप घेतला त्यानंतर ती आईची भूमिका साकारू लागली होती. 

7/7

या मालिकेपासून आतापर्यंत विशाल हा श्वेता तिवारीला आई म्हणून हाक मारतो.