Chanakya Niti : महिलांना सर्वात जास्त आकर्षित करतात पुरुषांच्या 'या' सवयी!

Chanakya Niti : आचार्य चाणक्यने सांगितलंय की, पुरुषांमधील या सवयांकडे महिलांना सर्वात जास्त आकर्षित होतात. 

| Oct 18, 2024, 16:52 PM IST
1/7

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवन जगण्याचे अनेक सरळ आणि सोपे मार्ग सांगितले आहेत. त्याशिवाय मानवाच्या स्वभाव आणि त्यांच्या गुणांबद्दलही सांगितलं, जेणे करुन त्यांचं आयुष्य सुखकर आणि आनंदी होईल. 

2/7

नीतिशास्त्रात आचार्य चाणक्यने पुरुषांमधील काही सवयींबद्दल सांगितलंय. पुरुषांमधील या सवयीमुळे महिला त्यांच्याकडे सर्वाधिक आकर्षित होतात. 

3/7

शांत आणि संयोजित पुरुष

आचार्य चाणक्य म्हणतात की माणूस जितका शांत आणि स्थिर असेल तितका त्याच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होते. अशा लोकांना समाजात खूप मान मिळतो आणि महिलांही अशा पुरुषांकडे आकर्षित होतात. 

4/7

मेहनती आणि प्रामाणिक

प्रत्येकाला एक मेहनती आणि प्रामाणिक माणूस आवडतो. जो कठोर परिश्रमाला न घाबरता आणि प्रत्येक काम प्रामाणिकपणे दाखवतो तो व्यक्ती सगळ्यामध्ये उठून दिसतो. ज्या पुरुषांमध्ये हे गुण असतात त्यांना कुटुंबात तसंच समाजात मान-सन्मान मिळतो. हे गुण माणसाला करिअरच्या क्षेत्रातही खूप उंचीवर घेऊन जातात. चाणक्यच्या मते, जो मनुष्य नशिबावर अवलंबून राहत नाही आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करत राहतो तो जीवनात नक्कीच यश मिळवतो आणि हे पुरुष महिलांना अतिशय आवडतो. 

5/7

इतरांचे लक्षपूर्वक ऐकणे

समाजातील बहुतेक लोक असे असतात ज्यांना फक्त त्यांचे मत मांडायचं असतं. त्यांच्याशी कोणी बोलत असले तरी त्यांचे लक्ष दुसरीकडे असतं. अशा लोकांना आदर मिळत नाही आणि अशा लोकांवर कोणी विश्वास ठेवत नाही. याउलट, एखाद्या माणसामध्ये इतरांना ऐकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता चांगली असेल तर तो सर्वांचा लाडका बनतो. महिलांनाही पुरुषांचा हा गुण आवडतो, अशा व्यक्तीला समाजात सन्मान मिळतो. 

6/7

प्रेमात निष्ठा

प्रत्येक महिलांना असं वाटतं की ती ज्याच्यावर प्रेम करते त्याने कधीही तिचा विश्वासघात करू नये. याचा अर्थ प्रेम जीवनात विश्वासू राहावा. पुरुषात निष्ठेचा गुण असेल तर महिला आयुष्यभर त्याच्यावर प्रेम करत राहतात. चाणक्यच्या मते, चांगल्या वैवाहिक जीवनासाठी प्रत्येक पुरुषामध्ये हा गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. 

7/7

समान वागणूक देणारे

महिलांना देखील असे पुरुष आवडतात जे प्रत्येकाला समान वागणूक देतात आणि जे भेदभाव करत नाहीत आणि प्रत्येकाचा आदर करतात. तसंच तुमचे वागणे असे असेल तर तुम्हाला सामाजिक स्तरावरही प्रसिद्धी मिळते. चाणक्याच्या मते, जे लोक श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव करतात आणि लोकांमध्ये दोष शोधत राहतात ते कोणालाच आवडत नाहीत. प्रत्येक महिलेला असे पुरुष आवडतात जे सर्वांचा आदर करतात आणि सद्गुणी असतात. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)