बाईक असो वा कार, 'इथं' इंधनाशिवाय चालतात वाहनं; रक्त गोठवणाऱ्या थंडीत कसा होतो हा चमत्कार?

Travel Facts : भारतात आहे ही रहस्यमयी जागा... ऑक्सिजन विरळ असला तरीही इथं जीवाची बाजी लावत भेट देतात अनेकजण... 

Oct 18, 2024, 15:32 PM IST

Travel Facts : भारताला विविधतेनं नटलेला देश नेमकं का म्हणतात हे तुम्हाला माहितीये का? देशातील अनेक आगळ्यावेगळ्या ठिकाणांना पाहून तुम्हाला याचा अंदाज येईलच... 

1/8

प्रवासाची आवड

leh ladakh Magnetic Hill zero gravity place

प्रवासाची आवड असणाऱ्या आणि विविध ठिकाणांना सातत्यानं भेट देणाऱ्या अनेकांच्याच प्राधान्यस्थानी एक अशी जागा आहे, जिथं एकदातरी भेट देण्याचा अट्टहास असतो. 

2/8

गर्दी

leh ladakh Magnetic Hill zero gravity place

दैनंदिन धकाधकीपासून, गर्दीपासून आणि प्रदूषणापासून कैक मैल दूर डोंगरांच्या कुशीत आणि हवेत ऑक्सिजन विरळ होत जातो अशा एका ठिकाणी ही जागा असून, तिथवर पोहोचणं हीच अनेकांसाठी परवणी. 

3/8

इंधन

leh ladakh Magnetic Hill zero gravity place

वाहनामध्ये इंधन नसेल तरीही वाहन रस्त्यावर चालण्याची क्षमता असणारी ही जागा म्हणजे लेह- लडाखमधील 'मॅग्नेटीक हिल' (Magnetic Hill). लेह कारगिल महामार्गावर साधारण 30 किमी अंतरावर पोहोचलं असता या ठिकाणी पोहोचता येतं. 

4/8

रस्ता

leh ladakh Magnetic Hill zero gravity place

जिथं अनेक पर्वतांमध्ये उताराच्या रस्त्यांमुळं वाहनं खालच्या दिशेनं पुढे जातात तिथं या ठिकाणी मात्र वाहनं 20 किमी प्रतितास इतक्या वेगानं वरच्या दिशेला जाताना दिसतात. यामागं कोणता चमत्कार नसून, शास्त्रीय कारणं आहेत.   

5/8

शास्त्रीय कारण

leh ladakh Magnetic Hill zero gravity place

पहिलं शास्त्रीय कारण आणि सिद्धांत म्हणजे चुंबकीय बळाचा आणि दुसरा म्हणजे ऑप्टिकल इल्जुजनचा. इथं चुंबकीय बळामुळं गती निर्माण होऊन वाहनं ओढली जातात तर, काहींना तसा भास होतो.   

6/8

लडाख

leh ladakh Magnetic Hill zero gravity place

इथं जो रस्ता वरच्या बाजूस एखाद्या उताराप्रमाणं दिसतो ती प्रत्यक्षातच एक उताराची पट्टी असते. ज्यामुळं वाहन वरच्या बाजूला जात आहे असा भास आपल्या मनास निर्माण होतो. 

7/8

मॅग्नेटिक हिल

leh ladakh Magnetic Hill zero gravity place

मॅग्नेटिक हिल हा परिसर मॉन्कटनमध्ये असून, इथं चुंबकीय तत्त्वांमुळं वाहनं सुरु न करताच चालू लागतात. 1930 मध्ये याविषयीचं पहिलं निरीक्षण समोर आलं होतं.   

8/8

पर्यटन

leh ladakh Magnetic Hill zero gravity place

मागील काही वर्षांमध्ये माध्यमांच्या उपलब्धतेमुळं हे ठिकाण अनेकांच्याच नजरेत आलं असून, तिथं येणाऱ्यांचा आकडाही वाढताना दिसत आहे.