गृहकर्जावर केंद्र सरकार सबसिडी देणार; 2024 च्या निवडणुकांआधी योजना सुरु होणार?

गृहकर्जावर केंद्र सरकार सबसिडी देणार असल्याची माहिती सूत्रांकडुन मिळालेय. 60 हजार कोटी सबसिडी देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

Sep 26, 2023, 23:34 PM IST

Home Loan EMI  : गृहकर्ज घेणा-यांसाठी एक खुशखबर आहे. केंद्र सरकार गृहकर्जावर सबसिडी देण्याचा विचार करतंय. ही सबसिडी जवळपास 60 हजार कोटी इतकी असू शकते. लहान आणि फायदेशीर घरांसाठी ही सबसिडी दिली जाऊ शकते.

1/7

गृहकर्जावर केंद्र सरकार सबसिडी देण्याची शक्यता आहे. 2024 च्या निवडणुकांआधी योजना सुरु करण्याच्या हालचाली असल्याचे समजते.   

2/7

पुढच्या 5 वर्षात ही सबसिडी देण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. ही योजना 2028 सालापर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे.

3/7

लहान आणि फायदेशीर घरांसाठी ही सबसिडी दिली जाऊ शकते.  याचा ग्राहकांना मोठा फायदा मिळू शकतो. 

4/7

50 लाखांपेक्षा कमी आणि 20 वर्षांच्या अवधीचं गृहकर्ज पात्र ठरणार आहेत. 

5/7

25 लाख गृहकर्जधारकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

6/7

सबसिडी थेट गृहकर्जधारकांच्या खात्यात जमा होणार आहे.

7/7

गृहकर्जावर 3 ते 6.5 टक्के वार्षिक सबसिडी मिळण्याची शक्यता आहे.