मुलींना कमी वयात मासिक पाळी का येते, काय सांगतो वैद्यकीय अहवाल

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मुलींना 6 ते 7  वयोगटात पाळी येण्यास सुरुवात होत आहे. यासगळ्यात पालकांनी भूमिता महत्त्वाची आहे असं तज्ज्ञ सांगतात.   

Jul 28, 2024, 13:52 PM IST
1/8

 शरीरात एका ठराविक काळाने बदल घडून येतात.  मासिक पाळी येणं म्हणजे मुली शारीरिक दृष्ट्या एका जीवाला जन्म देण्यासाठी परिपक्व होत असतात. साधारणपणे 12 ते 16 या वयोगटात मुलींना पाळी येण्यास सुरुवात होते. मात्र आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे मुलींना 6 ते 7  वयोगटात पाळी येण्यास सुरुवात होत आहे. 

2/8

इंडिया टु़डेने दिलेल्या वृत्तानुसार देशातील हा अहवाल अत्यंत धक्कादायक असून हे नेमंक कशामुळे होत आहे, त्याची कारणं काय आणि त्यावर कोणते वैद्यकीय उपचार आहेत का यावर डॉक्टरांचं रिसर्च सुरु आहे. 

3/8

कमी वयात मासिकपाळी येण्याची कारणं

यावर नेमकं असं कारण सांगता येत नसलं तरी मासिक पाळी 10 वर्षाच्या आत येण्याची काही प्राथमिक अंदाज सांगितले आहेत. स्त्री रोग तज्ज्ञांच्या मते, 10 वर्षाच्या आत असलेल्या मुलींचं वजन त्यांच्या वयाच्या अनुषंगाने जास्त वाढलेलं असतं.

4/8

फास्टफूड

सात ते आठ वयोगटातल्या मुली सर्वात जास्त फास्टफुडचं सेवन करत असल्याचं दिसून आलं. फास्टफूडच्या सवयीमुळे वजन जास्त वाढतं आणि शरीरातील  'इस्ट्रोजेन'मध्ये वाढ होते ,त्यामुळे अकाली तारुण्य येण्यास सुरुवात होते.  फास्टफूडमध्ये मैदा आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं, याचा गंभीर परिणाम थेट मुलींच्या शारीरिक बदलावर होत आहे.   

5/8

अनुवंशिकता

वैद्यकीय अहवालानुसार अशीही शक्यता वर्तवण्यात येते की, मासिक पाळीचा त्रास हा अनुवंशिक देखील असतो. जर आईला लवकर पाळी आली किंवा आईला मासिक पाळीचा त्रास झाला असेल तर ते मुलींच्या बाबतीतही होतं. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

6/8

मानसिक आणि शारीरिक बदलांना कसं सामोरं जावं ?

शरीरात झालेले बदल स्विकारण्या इतपत या मुलींमध्ये मानिसकता तयार झालेली नसते.  त्यामुळे मूड बदलणं, गोंधळून जाणं, भिती वाटणं सतत चिडचिड होणं या अशा त्रासातून मुली जात असातात. बऱ्याचदा आपल्यासोबत काहीतरी वेगळं घडतंय असं वाटून या मुलींच्या मनात लाजिरवाण्या आणि अपराधीपणाच्या भावना येतात. 

7/8

अशा वेळी मुलींना घरच्यांच्या आधाराची गरज असते, या सगळ्यात अनेक मुली नैराश्यात जातात. कमी वयात पाळी येणं हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसल्याचं म्हटलं जातं. अशा मुलींना भविष्यात पाळीच्या संबंधित समस्या निर्माण होतात. त्यामुळे मुलांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत पालकांनी जागृत असायला हवं, असं डॉक्टर म्हणतात.   

8/8

पालकांची भूमिका

मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबरोबरच त्यांच्या शारीरिक बदलांकडे पालकांनी लक्ष देणं भाग आहे. 10 वर्षांच्या आत असलेल्या आपल्या मुलींच्या स्तनांचा आकार वाढतोय का ? त्याचबरोबर जननइंद्रियांच्या जागी केस यायला सुरुवात होतेय असं जाणवल्यास लगेचच आपल्या मुलींची वैद्यकीय तपासणी करावी. अशावेळी डॉक्टर पालकांना आणि मुलींनाही आरोग्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करु शकतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)