आपली मुंबई समुद्रात बुडणार; 2040 पर्यंत कसं काय होणार? संशोधकांचा धक्कादायक अहवाल

2040 पर्यंत अर्धी मुंबई पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. 

Aug 12, 2024, 22:53 PM IST

Mumbai Under Water:  मुंबई पाण्याखाली जाण्याची शक्यता...मुंबईतील 10 टक्के भूभाग 2040 सालापर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या धक्कादायक अहवालामुळे खळबळ उडाली आहे. 

1/7

मुंबईकरांची चिंता वाढवणारा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. मुंबई समुद्रात बुडणार असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. 

2/7

 21व्या शतकाच्या अखेपर्यंत सर्व 15 शहरांमधील समुद्राची पाणी पातळी वाढत राहणार आहे. यात मुंबईला सर्वाधिक धोका असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

3/7

हवामान बदलामुळं समुद्राची पाणी पातळी वाढत चालली आहे. 1987 ते 2021 पर्यंत मुंबईच्या समुद्र पातळीत 4.440 सेंटीमीटरची वाढ नोंदवली आहे.

4/7

या अभ्यास समुद्रकिनारी असलेल्या देशातील 15 शहरांची सविस्तर माहिती घेण्यात आली आहे. यात मुंबई, चेन्नई, तिरुवनंतपुरम, कोची, मंगळुरू, विशाखापट्टणम, कोझिकोड, हल्दिया, कन्याकुमारी, पणजी, पुरी, उडुपी, पारादीप, तुत्तुकुडी यांचा समावेश आहे. 

5/7

मुंबईतील 10 टक्के भूभाग 2040 सालापर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

6/7

हवामान बदलामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत असून, जल, कृषी, वन, जैवविविधता आणि आरोग्यावर याचा परिणाम होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.   

7/7

बंगळुरूस्थित थिंक टँक सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी आणि पॉलिसीकडून ग्लोबल वार्मिंगच्या दुष्परिणामांबाबत संशोधन करण्यात आले.