मनू भाकेरचं पदक, विनेशची झुंज आणि तुर्किचा कुल डॅडी... पॅरिस ऑलिम्पिकमधील 8 यादगार क्षण

Paris Olympic 2024 : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिकचा सांगता समारोप झालाय. यंदाचं ऑलिम्पिक अनेक गोष्टींमुळे यादगार ठरलंय. अमेरिकेने 40 सुवर्ण पदकांसह तब्बल 126 पदकं पटकावली. तर चीन 91 पदकांसह दुसऱ्या स्थानावर होता. भारताने पाच कांस्य आणि 1 रौप्य अशी सहा पदकं जिंकली.

| Aug 12, 2024, 21:29 PM IST
1/10

मनू भाकेरचं पदक, विनेशची झुंज आणि तुर्किचा कुल डॅडी... पॅरिस ऑलिम्पिकमधील 8 यादगार क्षण

2/10

खेळाडूंचा कुंभमेळा समजली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा संपली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेली ऑलिम्पिक स्पर्धा 15 दिवस चालली. ऑलिम्पिक अनेक गोष्टींमुळे यादगार ठरलंय. अनेक नवे विक्रम रचले गेले. अमेरिकेने 40 सुवर्ण पदकांसह तब्बल 126 पदकं पटकावली. तर चीन 91 पदकांसह दुसऱ्या स्थानावर होता. भारताने पाच कांस्य आणि 1 रौप्य अशी सहा पदकं जिंकली.  (फोटो- PTI/Getty)

3/10

भारताची नेमबाज मनू भाकेर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची सर्वात यशस्वी खेळाडू ठरली. 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात मनूने कांस्य पदक पटकावलं. त्यानंतर मिश्र सांघिक प्रकारातही कांस्य पदकाला गवसणी घातली. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकेर ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. (फोटो- PTI)

4/10

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली खेळाडू म्हणजे भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट. 50 किलो वजनी गटात विनेशने अंतिम फेरीत धडक मारली. तीने जपानच्या वर्ल्ड चॅम्पियनयुई सुसाकीचा पराभव करत इतिहास रचला. पण अंतिम फेरीआधी 100 ग्रॅम वजन वाढल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं. (फोटो- PTI)

5/10

22 वर्षाचा फ्रांसचा जलतरणपटू लिओन माशॉन हा पॅरिस ऑलिम्पिकचा सर्वाधिक यशस्वी खेळाडू ठरला. लिओन माशॉनने 4 गोल्ड मेडलची कमाई केली. यात एकाच दिवसात त्याने 200 मीटर बटरफ्लाय आणि 200 मीटर बेस्टस्ट्रोक प्रकार सुवर्णपदक कमावलं. एकाच ऑलिम्पिकमध्ये चार गोल्ड मेडल जिंकणारा तो फ्रान्सचा पहिला खेळाडू ठरला. 

6/10

पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. अर्शद नदीमने  92.97 मीटर भाला फेकत नवा ऑलिम्पिक रेकॉर्ड स्थापित केला. या प्रकारात अर्शद नदीने सुवर्ण तर भारताच्या नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकलं.

7/10

पॅरिस ऑलम्पिकमध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरला तो तुर्कीचा कुल डॅडी अर्था युसूफ डिकेच हा खेळाडू. 51 वर्षांच्या युसूफ डिकेचचा नेमबाजी करतानाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. नेमबाजी करताना लागणाऱ्या कोणत्याही गोष्टी न वापरता साधारण चष्मा घालत युसूफ डिकेचने निशाणा साधला आणि रौप्य पदक पटकावलं. 

8/10

ब्राझीलाच सर्फर गॅब्रिअल मेदीनाचा एक फोटो पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान चांगलाच व्हायरल झाला. या फोटोत गॅब्रिअल मेदीना समुद्रांच्या लाटांवर हवेत उभा असल्याचा भास होतोय. गॅब्रिअल आपल्या बोटांनी हवेत इशारा करताना दिसत आहे. हा फोटो पदक जिंकल्या नंतरचा आहे. कॅमेरामन जेरोम ब्रूलेट यांनी शानदार अंदाजात हा फोटो काढला आहे. 

9/10

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाला सुवर्ण पदक जिंकता आलं नाही. पण कांस्य पदकावर मात्र टीम इंडियाने शिक्कामोर्तब केलं. या स्पर्धेनंतर भारतीय हॉकी संघाचा अनुभवी गोलकिपर पीआर श्रीजेशने निवृत्ती घेतली. यावेळी गोलपोस्टवर बसलेल्या त्याचा क्षण भारतीय हॉकी चाहत्यांना भावूक करणारा ठरला.

10/10

पॅरिस ऑलिम्पिकच्या सांगात समारंभात हॉलीवूड सुपरस्टार टॉम क्रूजने जबरदस्त स्टंट करत सर्वांना हैराण केलं. टॉम क्रूझने या कार्यक्रमाता रोपच्या सहाय्याने स्टेडिअममध्ये झेप घेतली. पॅरिसच्या रस्त्यावर त्याने बाईकवरही स्टंट केले.