आधी कोंबडी की अंड? यापेक्षा मोठा झाला 'बटर चिकन'चा वाद, हायकोर्टात पोहोचलं प्रकरण? शोध कुणी लावला?

Butter Chicken Controversy : चमचमीत आणि लज्जतदार खाण्याची आवड असणाऱ्या मंडळींची कायम पसंती मिळणारा एक पदार्थ म्हणजे, बटर चिकन. सुरेख आणि तितक्याच सोप्या अशा पाककृतीच्या माध्यमातून तयार केला जाणारा हा मांसाहारी पदार्थ अनेकांच्याच पानात आला, की तो पटकन संपवला जातो. अशा या जगप्रसिद्ध बटर चिकनची नेमकी सुरुवात झाली कुठं आणि त्याचा हक्क नेमका कोणाकडे जातो यावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरु असून, आता त्या वादाला एक नवं वळण मिळालं आहे

May 29, 2024, 17:57 PM IST
1/8

बटर चिकन

Butter Chicken Invention Controversy New Turn Moti Mahal Daryaganj Delhi High Court

Butter Chicken Controversy : दरवळणारा सुगंध, चवीला किमान तिखट, नजरेत भरेल असा रंग आणि जीभेचे चोचले पुरवणारी चव असणारं हे बटर चिकन भारतामध्ये प्रांताप्रांतानुसार बदलतं. प्रत्येक राज्यात किंबहुना हा पदार्थ बनवणारा प्रत्येकजण तो त्यांच्या परीनं सादर करतात. 

2/8

बटर चिकनची नेमकी सुरुवात

Butter Chicken Invention Controversy New Turn Moti Mahal Daryaganj Delhi High Court

अशा या जगप्रसिद्ध बटर चिकनची नेमकी सुरुवात झाली कुठं आणि त्याचा हक्क नेमका कोणाकडे जातो यावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरु असून, आता त्या वादाला एक नवं वळण मिळालं आहे. जिथं न्यायमूर्ती अनिश दयाल यांनी मोती महलच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या याचिकेवर नोटिस जारी केली. 

3/8

या पदार्थांचं मूळ नेमकं कुठं?

Butter Chicken Invention Controversy New Turn Moti Mahal Daryaganj Delhi High Court

बटर चिकन आणि दाल मखनी या दोन्ही, प्रामुख्यानं उत्तर भारतीयांची पसंती असणाऱ्या या पदार्थांचं मूळ नेमकं कुठं आहे यासंदर्भातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला असून, दिल्लीच्या मोती महल रेस्तराँनं दरियागंज रेस्तराँ चेनचं ट्रेडमार्क रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 

4/8

पुढील सुनावणी

Butter Chicken Invention Controversy New Turn Moti Mahal Daryaganj Delhi High Court

सदर प्रकरणाची सुनावणी जुलै महिन्यात पार पडणार असून, दाल मखनी आणि बटर चिकन हे पदार्थ पहिल्यांदा कोणी बनवले हा वाद आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला आहे, जिथं टॅगलाईनच्या वापरावरून दोन रेस्तराँमध्ये वाद पेटला आहे.  

5/8

दरियागंज रेस्तराँ मालकांविरोधात खटला

Butter Chicken Invention Controversy New Turn Moti Mahal Daryaganj Delhi High Court

सदर प्रकरणी मोती महलकडून दरियागंज रेस्तराँ मालकांविरोधात खटला दाखल केला.  दरियागंज रेस्तराँ मालकांनी मोती महलशी आपण संलग्न असल्याचं भासवत जनतेची दिशाभूल केली आहे. जिथं त्यांच्याकडून दाल मखनी आणि बटर चिकन या पदार्थांच्या टॅगलाईनचा वापर करण्यात आला होता.   

6/8

खोटा दावा

Butter Chicken Invention Controversy New Turn Moti Mahal Daryaganj Delhi High Court

मोती महलच्या म्हणण्यानुसार दरियागंजकडून खोटा दावा करत पदार्थांवर ट्रेडमार्क सांगितला जात आहे. मोती महलकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार दरियागंजकडून संपूर्ण टॅगलाईन जशीच्या तशी वापरत त्यामध्ये फक्त हॉटेलच्या नावाचाच फरक दाखवत ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.   

7/8

मोती महल

Butter Chicken Invention Controversy New Turn Moti Mahal Daryaganj Delhi High Court

दरम्यान, मोती महलनं विरोधी हॉटेलकडून आपल्याला बटर चिकन या पदार्थाचं श्रेय घेण्यास थांबवण्यासोबतच 2 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची थेट मागणी केली आहे. 

8/8

रेस्तराँची आखणी

Butter Chicken Invention Controversy New Turn Moti Mahal Daryaganj Delhi High Court

फक्त पदार्थच नव्हे, तर दरियागंजकडून आपल्या हॉटेलातील इंटेरिअर आणि इतर गोष्टीही हुबेहूब तशाच दाखवत ग्राहकांना आकर्षित केला जात असल्याचा आरोपही मोती महल रेस्तराँकडून करण्यात येत आहे. तर, तिथं दरियागंजकडून मात्र मोती महलकडूनच आपल्या रेस्तराँची आखणी Copy केली जात असल्याचा प्रत्यारोप केला जात आहे.