Budh Gochar 2023 : धनु राशीत बुधाच्या संक्रमणामुळे 'या' राशींच्या समस्या वाढणार, होणार मोठं नुकसान

Budh Gochar 2023 :  ग्रहांचा राजकुमार बुधदेवाने धनु राशीत गोचर केलं आहे. बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे काही राशींचं नोठं नुकसान होण्याची भीती आहे. 

Nov 27, 2023, 13:22 PM IST
1/7

बुद्धिमत्ता, ज्ञान, विचार करण्याची क्षमता, उत्तम तर्क आणि उत्तम संवादाचा कारक ग्रहांचा राजकुमार बुध काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरणार आहे. 

2/7

वृषभ

या राशीच्या लोकांच्या दुसऱ्या आणि पाचव्या घराचा स्वामी बुध आहे. बुधाचं संक्रमण तुमच्यासाठी अशुभ आहे. तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार आहे. तुम्हाला संसर्गाचा सामना करावा लागणार आहे.   

3/7

वृषभ राशीच्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तुमच्या कौटुंबिक जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होणार आहे. तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये नुकसान सहन करावे लागणार आहे. 

4/7

कर्क

बुधाचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी कष्टदायक ठरणार आहे. या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वाईट व्यसनापासून दूर राहणं हिताचं ठरेल. तुम्हाला पचनाच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. 

5/7

कर्क राशीच्या लोकांचं आरोग्याच्या समस्या त्रासदायक ठरणार आहे. तुम्हाला हॉस्पिटल्सच्या पायऱ्या चढव्या लागणार आहे. तुमचं कोणासोबत वाद होणार आहे. 

6/7

सिंह

धनु राशीत बुधाचं संक्रमण या राशीच्या लोकांसाठी आर्थिक नुकसान घेऊन आला आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक अडथळ्यांनाचा सामना करावा लागणार आहे. सिंह राशीच्या लोकांच्या नात्यात चढ-उतार पाहवं लागू शकतं.  

7/7

सिंह राशीच्या लोकांना या काळात खूप काळजी घेणे गरजेचं आहे. पैशांचा व्यवहारात मोठं नुकसान होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)