निर्मला सितारामण एकाच वर्षीत दुसऱ्यांदा सादर करणार बजेट, का तेच जाणून घ्या?

Nirmala Sitharaman : नवनिर्वाचित अर्थमंत्री निर्मला सितारमण येत्या जुलैमध्ये 2024 -25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.   

Saurabh Talekar | Jun 12, 2024, 18:48 PM IST
1/7

निर्मला सीतारमण

मोदी सरकार 3.0 च्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर निर्मला सीतारमण यांनी बुधवारी सलग दुसऱ्यांदा अर्थ मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला.

2/7

नॉर्थ ब्लॉक येथे स्वागत

वित्त सचिव सोमनाथन आणि इतर उच्च अधिकाऱ्यांनी सीतारमण यांचे नॉर्थ ब्लॉक येथील कार्यालयात स्वागत केलं अन् त्यांना शुभेच्छा दिल्या.

3/7

अर्थसंकल्प 2024 -25

निर्मला सितारमण 2024 -25 साठी हा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री सीतारमण यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. 

4/7

पूर्ण अर्थसंकल्प

आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निर्मला सितारमण यांनी पुन्हा सरकार स्थापन केल्याने पुन्हा निर्मला सितारमण यांना पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न केलाय.

5/7

नवा विक्रम

जुलैमध्ये सीतारमण आपला सलग सातवा आणि सलग सहावा पूर्ण अर्थसंकल्प सादर करतील. यंदाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सितारमण नवा विक्रम रचणार आहेत. 

6/7

पहिल्या महिला मंत्री

सलग तिसऱ्यांदा मंत्री म्हणून सामील होणाऱ्या पहिल्या महिला मंत्री होण्याचा विक्रमही सीतारमण यांच्या नावावर आहे. अरूण जेठली यांच्यानंतर त्यांनी पदभार स्विकारला होता.

7/7

नवे बदल

दरम्यान, आगामी अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळणार? असा सवाल विचारला जातोय. निर्मला सीतारमण कोणते नवे बदल करणार? यावर देखील सर्वांचं लक्ष आहे.