पोट सुटलंय, वजन वाढलंय? लठ्ठपणा कमी करण्यासाठी असा चहा प्या!

Black Tea For Weight Loss: भारतीयांचे सर्वात आवडते पेय म्हणजे चहा. कामाचा ताण हलका करायचा असेल किंवा सुस्ती आली असेल तर हमखास चहा हा लागतोच. मात्र, वजन कमी करणाऱ्यांसाठी चहा मात्र योग्य नाही. चहाला वेळ नसली तरी वेळेचा चहा लागतो, अशी एक म्हणच आपल्याकडे प्रचलित आहे. त्यावरुन आपल्या भारतात चहाप्रेमी किती आहेत, याचा अंदाज येतो. मात्र, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर नेहमीच्या चहापेक्षा थोडा वेगळा चहा पिऊन बघा. 

Mansi kshirsagar | Jun 13, 2024, 12:29 PM IST
1/7

पोट सुटलंय, वजन वाढलंय? लठ्ठपणा कमी करण्यासाठी असा प्या चहा!

how to prepare black tea for weight loss in marathi

चहाला वेळ नसली तरी वेळेचा चहा लागतो, अशी एक म्हणच आपल्याकडे प्रचलित आहे. त्यावरुन आपल्या भारतात चहाप्रेमी किती आहेत, याचा अंदाज येतो. मात्र, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर नेहमीच्या चहापेक्षा थोडा वेगळा चहा पिऊन बघा. 

2/7

चहा-पावडर

how to prepare black tea for weight loss in marathi

चहा करण्यासाठी चहा-पावडर, साखर, दूध यांचा वापर केला जातो. मात्र, दूध आणि साखर या घटकांमुळं शरीरात जास्त कॅलरी जातात. त्यामुळं काळा चहा पिण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात. 

3/7

साखर नियंत्रणात राहते

how to prepare black tea for weight loss in marathi

ब्लॅक टी हे आरोग्यदायी पेय आहे. ब्लॅक टीमुळं रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसंच कॅफीनचं प्रमाणदेखील जास्त असते. 

4/7

शरीराला ताकद आणि उर्जा

how to prepare black tea for weight loss in marathi

कॅफीन या घटकामुळं शरीराला ताकद आणि उर्जा मिळते. चयापय क्रियेचा वेगदेखील वाढतो. त्यामुळं वजन कमी होण्यास मदत मिळते.

5/7

रोगप्रतिकारशक्ती

how to prepare black tea for weight loss in marathi

ब्लॅक टीमुळं रोगप्रतिकारशक्ती वाझते. पोट फुगणं आणि पोटाशी निगडीत समस्या कमी होतात. 

6/7

लिंबू घालून ब्लॅक टी

how to prepare black tea for weight loss in marathi

लिंबू घालून ब्लॅक टी प्यायल्यास वजन नियंत्रणात पाहते. ब्लॅक टी करताना त्यात साखर अजिबात घालू नये. 1 ते दीड ग्लास पाण्यात 2 चमचे चहापावडर घालून चहा करुन घ्या. त्यानंतर चहा पेल्यात ओतून त्यात लिंबू पिळून घ्या. अशा प्रकारे ब्लॅक टी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते. 

7/7

how to prepare black tea for weight loss in marathi

 दूध आणि साखरेच्या चहात 114 कॅलरी असतात. तर, 1.9 ग्रॅम फॅट असते. त्या उलट ब्लॅक टीमध्ये शून्य कॅलरी आणि फॅट असतात.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)