शाहरुख खान Instagram वर फक्त ६ जणांना करतो Follow, जाणून घ्या कोण आहेत हे भाग्यवान लोक?

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे (Shahrukh Khan) संपूर्ण जगभरात करोडो चाहते आहेत. आपल्या चित्रपटांशिवाय शाहरुख खान सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातूनही चाहत्यांना भेटत असतो. अनेकदा शाहरुख आपले सेल्फी शेअर करत असतो, तर कधी चाहत्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असतो. Instagram वर शाहरुख खानचे (Shahrukh Khan Instagram Account) 3.5 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. मात्र शाहरुख खान फक्त सहा लोकांनाच फॉलो करतो. आता हे सहाजण नेमके कोण आहेत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? चला तर मग जाणून घेऊयात.  

Feb 23, 2023, 13:47 PM IST
1/6

Gauri Khan: शाहरुख फॉलो करणाऱ्यांच्या यादीतीत पहिलं नाव अपेक्षित असून इतर कोणी नाही, तर त्याची पत्नी गौरी खान आहे. सुपरस्टार होण्याच्या आधीपासूनच गौरी खानने शाहरुख खानला साथ दिली असून, आजही खंबीरपणे पाठीशी उभी आहे. धर्माच्या भिंती ओलांडत दोघांनी लग्नगाठ बांधली असून बॉलिवूडमध्ये फेव्हरेट जोडींच्या यादीत आघाडीवर आहे.   

2/6

Aryan Khan: शाहरुख खान आपला मोठा मुलगा आर्यन खानलाही Instagram वर फॉलो करतो. आर्यन खानचे Instagram वर 24 लाख फॉलोअर्स आहेत. आर्यन खान सध्या Red Chillies Entertainment च्या एका प्रोजेक्टवर काम करत असून लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  

3/6

Suhana Khan: दरम्यान शाहरुख आपली मुलगी सुहानालाही Instagram वर फॉलो करतो. शाहरुख नेहमीच कामातून विश्रांती घेत कुटुंबासह वेळ घालवत असतो. अनेकदा त्याचे आणि गौरी खानचे फोटोही समोर आले आहेत. शाहरुख Instagram वर सुहानाच्या फोटोंवर अनेकदा कमेंटही करत असतो.   

4/6

Alia Chhiba:  शाहरुख खानसाठी कुटुंबच सर्वकाही असून त्याच्या यादीतील चौथं नावही त्यातीलच आहे. शाहरुख Instagram वर आलिया छिबालाही फॉलो करतो. आलिया ही गौरी खानच्या भावाची मुलगी आहे.   

5/6

Pooja Dadlani: दरम्यान या यादीतील पाचवं नाव शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीचं आहे. पूजा 2012 पासून शाहरुखची मॅनेजर आहे. अनेक कार्यक्रमात ती शाहरुखसह हजर असते. दोघांमध्ये चांगले कौटुंबिक संबंधही आहेत.   

6/6

Kajal Anand:  शाहरुखच्या फॉलोअर्सच्या यादीतील शेवटचं नाव काजल आनंदचं आहे. काजल आनंद सेलिब्रिटी पार्टींचं आयोजन करण्यासाठी ओळखली जाते. काजल शाहरुखची खास मैत्रिण आहे. काजल वकीलही असून संजय दत्तच्या कायदेशीर टीमचा भाग होती. मात्र नंतर तिने वकिली सोडली आणि फॅशन, लाइफस्टाइलमध्ये रस घेतला.