जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी

Oct 16, 2018, 09:55 AM IST
1/8

जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी

'कुछ कुछ होता है.... तुम नही समझोगे...' असं म्हटलं की लगेचच डोळ्यांसमोर 'राहुल', 'अंजली', 'टीना' ही पात्र उभी राहतात. 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या कुछ कुछ होता है या चित्रपटातील ही पात्र. 'प्यार दोस्ती है...' मैत्रीतच खरं प्रेम आहे, यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडणारा हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल 20 वर्षे उलटली आहेत. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाने फक्त प्रेम आणि मैत्रीच्याच नव्हे, तर बॉक्स ऑफिसवर एखाद्या चित्रपटाच्या यशाची गणितंही बदलली. चला तर मग, जाणून घेऊया 20 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चित्रपटाविषयी काही रंजक गोष्टी...  

2/8

जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी

'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटासाठी करण जोहरने सहाय्यक दिग्दर्शकाचं काम पाहिलं होतं. त्याचवेळी त्याच्या पहिल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याचं वचन शाहरुख खान आणि काजोलने त्याला दिलं होतं. 'कुछ कुछ होता है'साठी सुरुवातीपासूनच राहुल आणि अंजलीची भूमिका साकारण्यासाठी करणची अनुक्रमे शाहरुख खान आणि काजोललाच पसंती होती.  

3/8

जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी

टीनाच्या भूमिकेसाठी करणने ट्विंकल खन्नाकडे विचारणा केली होती. पण, तिने ही भूमिका नाकारली ज्यानंतर इतरही काही अभिनेत्रींपुढे या भूमिकेचा प्रस्ताव ठेवण्यात आला. अखेर राणी मुखर्जीने ही टीना साकारली.   

4/8

जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी

'कुछ कुठ होता है'च्या चित्रीकरणाच्या वेळी किंबहुना चित्रपटात एका मुलीच्या आईच्या भूमिकेत झळकणारी राणी ही त्यावेळी अवघ्या 19 वर्षांची होती. 

5/8

जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी

'कुछ कुछ होता है' मधील गाणीही विशेष गाजली. पण, या चित्रपटातील 'साजन जी घर आए..' या गाण्याच्या चित्रीकरणावेळी सलमान खान आणि काजोल हे एकमेकांशी बोलत नव्हते. 

6/8

जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी

चित्रपटात छोट्या 'अंजली'च्या भूमिकेत झळकणाऱ्या तेव्हाच्या बालकलाकार सना सईद हिने त्यावेळी रडण्याची दृश्यं चित्रीत करण्यासाठी ग्लिसरीन वापरण्यास नकार दिला होता. त्यामुळे मग नाईलाजास्तव करण तिला खरंखुरं रडवण्याचा प्रयत्न करत असे. 

7/8

जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी

चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये काजोल खरोखरच रडली होती. शाहरुख खानची काही क्लोज अप दृश्य ज्यामध्ये तो रडत होता, ते पाहून तिलाही रडूच आलं. 

8/8

जाणून घ्या 'कुछ कुछ होता है'विषयीच्या काही रंजक गोष्टी

सलमान खानने या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठीही आधी सैफ अली खान याला विचारण्यात आलं होतं. पण, त्याने 'अमन' साकारण्यास नकार दिला. ज्यानंतर चंकी पांडेच्या एका पार्टीमध्ये खुद्द सलमानच करणकडे आला आणि त्याने 'अमन'ची भूमिका साकारण्याची तयारी दर्शवली.