PHOTO: लग्नाआधीच झाली 34 मुलींची आई, परदेशातील व्यावसायिकाशी लग्न केल्यानंतर सोडलं बॉलिवूड; आता करतीये कमबॅक

Preity Zinta: सेलिब्रिटींची मुलं झालं की त्यांच्या चाहत्यांना फार आनंद होतो. पण आज आपण ज्या सुपरस्टार अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत तिचे चार-पाच नाही तर तब्बल 36 मुलं आहेत. या अभिनेत्रीला लग्नाआधी 34 मुलं होती. मग त्यानंतर तिनं परदेशातील बिझनेसमॅनशी लग्न केलं आणि सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला. चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री...  

Diksha Patil | Jul 15, 2024, 11:43 AM IST
1/7

लग्नाच्या आधी 34 मुलांची आई होणारी या अभिनेत्रीनं परदेशातील बिझनेसमॅनशी लग्न केलं. परदेश मंत्रीशी लग्न केल्यानंतर बॉलिवूडपासून स्वत: ला लांब झाली. 

2/7

अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर आता ती चित्रपटात कमबॅक करणार आहे. तुम्हाला प्रश्न असेल की आपण कोणाविषयी बोलत आहोत तर ती दुसरी कोणती अभिनेत्री नाही तर अभिनेत्री प्रीति झिंटा आहे. 

3/7

प्रीति झिंटाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती तिच्या सुंदरतेसाठी आणि तिच्या अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असते. प्रीति झिंटानं 2009 मध्ये तिच्या 34 व्या वाढदिवसाला स्पेशल केलं होतं. 

4/7

प्रीति झिंटानं ऋषिकेशच्या मदर मिरेकल या अनाथ आश्रमातून 34 मुलींना दत्तक घेतलं होतं. या त्या मुली होत्या ज्यांना आई-वडील नव्हते. 

5/7

प्रीति झिंटानं स्वत: याची माहिती एका मुलाखतीत दिली आहे. IANS रिपोर्ट्सनुसार, प्रीतिनं मुलाखतीत सांगितलं की 'मी 34 मुलींना दत्तक घेतलं आहे. मी त्यांच्या शिक्षणापासून त्यांच्या खाण्याचं, कपड्यांची सगळ्यांची काळजी घेईन.' 

6/7

प्रीतिनं तिच्या मुलाखतीत सांगितलं की 'हे मुलं आता माझा माझे आहे, ही माझी जबाबदारी आहे. मी नेहमीच त्यांच्याशी कनेक्टेड राहिनं आणि त्यांना वर्षातून दोनवेळा भेटायला जाईन.'

7/7

प्रीतिनं 2016 मध्ये अमेरिकी बिझनेसमॅन जीन गुडइनफशी लग्न केलं. प्रीति झिंटानंतर लॉस एंजेलिसला शिफ्ट झाली. तर 2021 मध्ये सरोगसीच्या मदतीनं ती जुळ्या मुलांची आई झाली. तर आता इतक्या वर्षानंतर ती सनी देओलच्या 'लाहौर 1947' या चित्रपटातून सिल्वर स्क्रीनवर कमबॅक करणार आहे.