Happy Birthday Taapsee : जाणून घ्या काही खास गोष्टी

Aug 01, 2019, 15:04 PM IST
1/6

9 वर्षांपूर्वी तेलुगू चित्रपटातून करियरची सुरुवात करणारी बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूड चित्रपटांसह, साऊथ इंडियन चित्रपटांमध्येही तिने आपल्या भूमिकेची छाप सोडली आहे. तापसीने डेव्हिड धवन यांच्या 'चष्मे बहाद्दूर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्या चित्रपटापासून ते अगदी तिच्या आगामी 'सांड की आँख' या चित्रपटापर्यंत तिने विविध भूमिका साकारत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. आज तापसी तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे.

2/6

अनेकांना माहित नसेल, पण तापसीने इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे. 'फेमिना मिस इंडिया 2008'मध्ये निवड होण्याआधी तापसीने सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केलं आहे. तापसीने एमबीएमसाठीची प्रवेश परिक्षाही पास केली आहे.

3/6

तापसीने 4थ्या इयत्तेपासूनच कथ्थक आणि भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली. नृत्य प्रकारात प्राविण्य मिळवलेल्या तापसीने कॉलेज स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसं मिळवली आहेत. याशिवाय, तापसी स्क्वाश खेळही उत्तम खेळते. 

4/6

तापसीने 'रनिंग शादी डॉट कॉम' या चित्रपटात काम केलं. या चित्रपटाने ती इतकी प्रेरित झाली की, तिने तिची बहीण शगुन पन्नू आणि मित्र फराह परवरेशसोबत स्वत:ची वेडिंग प्लॅनिंग कंपनी सुरु केली. 'द वेडिंग फॅक्टरी' या नावाने तापसीने कंपनी सुरु केली आणि त्यांनी यशस्वीपणे काही विवाहसोहळ्यांचं नियोजनही केलं.

5/6

तापसीने तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमधून अतिशय सहजरित्या चित्रपटांसाठी डबिंगही केलं आहे. जाट सिख असलेल्या तापसीचं हिंदी आणि इंग्रजीही तितकंच प्रभावी आहे.  

6/6

2011 या वर्षात तिने 7 दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत करियरमधील एक वेगळीच उंची गाठली. यादरम्यान तिने अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली.