#PriyankaNickWedding : प्रियांका- निकच्या लग्नाचा इतका खर्च!

Dec 07, 2018, 09:45 AM IST
1/5

#PriyankaNickWedding : प्रियांका- निकच्या लग्नाचा इतका खर्च!

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने अमेरिकन गायक निक जोनास याला डेट केल्यानंतर काही दिवसांपूर्वीत त्याच्याशी लग्नगाठ बांधली. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या आफ्टर पार्टीत या दोघांची भेट झाली. ज्यानंतर मेट गालाच्या रेड कार्पेटवर दोघांना प्रथमच एकत्र पाहण्यात आलं. प्रियांका आणि निक यांच्यामध्ये असणाऱ्य़ा मैत्रीच्या या नात्यात एक सुरेख वळण आलं आणि अखेर या जोडीने एकमेकांना साथ देण्याची वचनं दिली. 

2/5

#PriyankaNickWedding : प्रियांका- निकच्या लग्नाचा इतका खर्च!

राजस्थानमधील जोधपूर येथे असणाऱ्या उमेदभवन पॅलेसमध्या प्रियांका-निकचा विवाहसोहळा पार पडला. खिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतींमध्ये हा सोहळा रंगला. 

3/5

#PriyankaNickWedding : प्रियांका- निकच्या लग्नाचा इतका खर्च!

काही खास पाहुणे आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाहसोहळ्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. ज्यानंतर डोळे दीपवणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यासाठी नेमका किती खर्च झाला असेल, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करु लागला. या प्रश्चाच्या उत्तरार्थी जेव्हा खर्चाचा आकडा समोर आला तेव्हा अनेकजण अवाक् झाले.

4/5

#PriyankaNickWedding : प्रियांका- निकच्या लग्नाचा इतका खर्च!

'झी बिझनेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार प्रियांका आणि निकने एक- दोन नव्हे, तर तब्बल पावणे पाच कोटी रुपये खर्च केल्याचं कळत आहे. या खर्चामध्ये प्रियांका आणि निकच्या कपड्यांचा वगैरे खर्च जोडण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांची किंमत जोडली असता हा आकडा आणखी वाढेल. 

5/5

#PriyankaNickWedding : प्रियांका- निकच्या लग्नाचा इतका खर्च!

हॅलिकॉप्टरसाठी जवळपास २० लाख रुपये, हिंदू विवाहसोहळ्यासाठी ३० लाख रुपये, पाहुण्यांच्या खाण्यापिण्यासाठी जवळपास ४३ लाख रुपये, असा एकंदर खर्च या लग्नसोहळ्यात झाला. ज्याची बेरीज केली असता आकडा ४.१३ कोटी ही संख्या ओलांडत आहे. लग्नसोहळा म्हणजे 'स्टेटस सिंबल' हा ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये स्थिरावला आहे. त्यामुळे या सोहळ्यावर सेलिब्रिटी बराच खर्चही करताना दिसत आहेत.