1/6
सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये असणारी एक दरी कमी झाली आहे. मुख्य म्हणजे आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांचे साक्षीदार होण्याची संधी चाहत्यांना मिळत आहे. अशीच संधी सध्या दिली आहे एका अभिनेत्रीने. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नावाजलेल्या या अभिनेत्रीला मातृत्वाची चाहूल लागली असून ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियाच्याच माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. ही अभिनेत्री म्हणजे ऍमी जॅक्सन. (छाया सौजन्य- ऍमी जॅक्सन/ इन्स्टाग्राम)
2/6
ऍमीने इन्स्टाग्रामवर एक सुरेख असा फोटो पोस्ट करत तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या आनंदाच्या प्रसंगात चाहत्यांनाही सहभागी करुन घेतलं आहे. ऍमी आणि तिचा प्रियकर/ होणारा पती जॉर्ज पानायोतू George Panayiotou त्यांच्या बाळाच्या स्वागतासाठी तयार असून, त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. खुद्द ऍमिने या फोटोसोबत लिहिलेलं कॅप्शन वाचता याचाच अंदाज येत आहे. (छाया सौजन्य- ऍमी जॅक्सन/ इन्स्टाग्राम)
3/6
4/6
5/6
प्रतिक बब्बरसोबत 'एक दिवाना था' या चित्रपटाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करत तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. काही दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच तिने 'सिंग इज ब्लिंग' या चित्रपटात खिलाडी कुमारसोबत स्क्रीन शेअर केली होती. तर, सुपरस्टार रजनीकांत यांच्या '२.०' या चित्रपटातूनही ती झळकली होती. ऍमी जॅक्सन ही अभिनेता प्रतिक बब्बरसोबतच्या तिच्या बहुचर्चित प्रेमप्रकरणामुळेही प्रकाशझोतात आली होती. (छाया सौजन्य- ऍमी जॅक्सन/ इन्स्टाग्राम)
6/6