90 कोटींचं कर्ज, घरावर जप्ती अन् धीरुभाईंची ऑफर...; भावूक होत अमिताभ म्हणाले, 'माझ्याबद्दल...'

Amitabh Bachchan Emotional About Dhirubhai Ambani: धीरुभाई अंबानींबद्दल बोलताना अमिताभ बच्चन यांचा कंठ दाटून आला होता. नेमकं त्यावेळेस काय घडलेलं आणि धीरुभाई अमिताभ यांच्याबद्दल काय म्हणाले होते जाणून घेऊयात...

| Oct 11, 2024, 13:40 PM IST
1/13

abambani

अमिताभ बच्चन यांचे अंबानी कुटुंबाबरोबर असलेले घरोब्याचे संबंध जगजाहीर आहेत. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का, अंबानी यांनी एकदा अमिताभ यांच्यावर असलेलं सर्व कर्ज फेडण्याची ऑफर दिलेली. हा प्रसंग सांगताना अमिताभही भावूक झालेले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात नक्की घडलेलं काय...

2/13

abambani

बॉलिवूडमधील सर्वात श्रेष्ठ अभिनेत्यांपैकी एक असलेले अमिताभ बच्चन यांचा आज 82 वा वाढदिवस आहे. फार कमी लोकांना ठाऊक असेल पण अमिताभ बच्चन आणि दिवंगत उद्योजक तसेच रिलायन्सचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचे सलोख्याचे संबंध होते. या दोघांनीही आपआपल्या क्षेत्रात मोठं नाव कमावलं. अमिताभ हे आज मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येकासाठी आदर्श आहेत तर धीरुभाई अंबानींसारखं उद्योजक होण्याचं स्वप्न आजही भारतामधील हजारो तरुण पाहतात.

3/13

abambani

मात्र अमिताभ आणि धीरुभाई या दोघांनाही आपआपल्या क्षेत्रात मोठं होण्याच्या प्रवासामध्ये कठोर काळ पाहिला आहे. एकदा तर असा काळ होता की कोणीही मदत करायला पुढे येत नसताना धीरुभाई अंबानींनी अमिताभला कोट्यवधींची मदत देऊ केली होती. 

4/13

abambani

मात्र ही मदत न स्वीकारता अमिताभ यांनी ती नाकारली होती. पण यामधून त्यांनी प्रेरणा घेऊन जे काही केलं आणि त्यावर धीरुभाई ज्या पद्धतीने व्यक्त झाले त्या आठवणी सांगताना अमिताभही गहिवरुन गेले.

5/13

abambani

1990 च्या दशकामध्ये अमिताभ बच्चन यांचं दिवाळं निघालं होतं. त्यांनी आपली अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एबीसीएल नावाची प्रोडक्शन कंपनी सुरु केली होती. मात्र 1999 मध्ये कंपनीला प्रचंड तोटा झाला. 

6/13

abambani

एक एक करत कंपनी आणि अमिताभ यांच्यावर 90 कोटी रुपयांचं कर्ज झालं. अमिताभ यांनी पैसे परत करावे म्हणून त्यांना धमकावलं जाऊ लागलं. त्यांच्या घरावरही जप्ती येण्याची वेळ आली होती.

7/13

abambani

याचवेळी अमिताभ यांच्या मदतीला रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा धीरुभाई अंबानी धावून आले होते. या आर्थिक संकटातून अमिताभ यांना बाहेर काढण्यासाठी धीरुभाई यांनी एक ऑफर दिलेली. मात्र अमिताभ यांनी ती नम्रपणे नाकारली होती.

8/13

abambani

रिलायन्सच्या 40 व्या वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये अमिताभ यांनी हजारो लोकांसमोर धीरुभाई अंबानींनी देऊ केलेल्या मदतीचा हा संपूर्ण प्रसंग सांगितला होता.

9/13

abambani

कठीण काळात धीरुभाईंनी कशी मदत देऊ केली होती आणि त्यांनी कशाप्रकारे अनिल अंबानींना आपला संदेश घेऊन पाठवलेलं हे सारं अमिताभ यांनी सांगितलं. 

10/13

abambani

धीरुभाई यांनी देऊ केलेल्या रक्कमेतून माझ्या साऱ्या आर्थिक अडचणी दूर झाल्या असत्या. मात्र मी ही ऑफर स्वीकारली नाही. पण त्यांनी देऊ केलेली मदत पाहून मी भारावून गेलो होत, असं अमिताभ म्हणाले. पुढे सर्व काही नीट झालं आणि मला माझं कर्ज फेडता आलं, असं अमिताभ म्हणाले.

11/13

abambani

"यानंतर एका कार्यक्रमाला आपल्याला धीरुभाईंनी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी कॉर्परेट श्रेत्रातील मान्यवर मंडळींबरोबर बसलेले असताना धीरुभाईंनी मला तिथे बसायला बोलवलं. मी नकार देत असतानाही त्यांनी मला तिथे बळजबरीने बसवून घेतलं. त्यानंतर माझ्याबद्दल बोलताना त्यांनी इतरांना, 'ये लडका गिरा था, लेकीन खुद के दम पे आज खडा हुवा है, मुझे इसपे गर्व है, (हा पोरगा पडला होता. मात्र तो स्वत:च्या जीवावर पुन्हा उभा राहिला आहे. मी याचा सन्मान करतो) असं सांगितलं होतं," असं म्हणत अमिताभ भावुक झाले.

12/13

abambani

"धीरुभाईंनी माझ्याबद्दल उच्चारलेले ते शब्द त्यांनी देऊन केलेल्या मदतीपेक्षा अनेक पटींनी मौल्यवान आहे," असंही अमिताभ यांनी यावेळी म्हटलं.  

13/13

abambani

कर्जाचा डोंगर अंगावर असताना अमिताभ यांना 'मोहब्बते' आणि त्यानंतर टीव्हीवर आलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या दोन प्रोजेक्टमुळे पुन्हा मनोरंजनसृष्टीमध्ये जम बसवता आला. त्यानंतर अमिताभ यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. (सर्व फोटो - सोशल मीडियावरुन साभार)