Photos: 91 व्या वर्षी सहावं लग्न, लग्नानंतर 2 महिन्यात मृत्यू; मागे ठेवली 2313 कोटींची संपत्ती!

Billionaire Death Married 6th Time At Age Of 91: आपल्या कामापेक्षा वादग्रस्त विधानं आणि नको त्या गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या या व्यक्तीने वयाच्या 91 व्या वर्षी सहावं लग्न केलं होतं. लग्नानंतर दोन महिन्यांमध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिनेत्रींना डेट करण्यासाठी कोट्यवधी रुपये उडवणारा हा उद्योजक होता तरी कोण?  

| Aug 18, 2024, 11:26 AM IST
1/11

Richard Lugner Death

वयाच्या 91 व्या वर्षी केलं सहावं लग्न, लग्नानंतर 2 महिन्यांमध्येच झाला या उद्योगपतीचा मृत्यू! अभिनेत्रींना डेटवर घेऊन जाण्यासाठी मोजायचा कोट्यवधी रुपये, जाणून घेऊयात या उद्योगपतीबद्दल...  

2/11

Richard Lugner Death

ज्या उद्योगपतीबद्दल आपण बोलत आहोत त्याचं नाव आहे रिचर्ड लुगनर! ते ऑस्ट्रीयातील अब्जाधीश बांधकाम व्यवसायिक तसेच उद्योजक होते. त्यांचं नुकतच वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं आहे. रिचर्ड हे मागील काही महिन्यांपासून आरोग्यविषय समस्यांना तोंड देत होते. याच वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या हृदयाची शस्रक्रीया झाली होती.

3/11

Richard Lugner Death

व्हेनिसेस व्हिला येथे रिचर्ड लुगनर यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती ऑस्ट्रीयन प्रसारमाध्यमांनी दिली आहे. आपल्या श्रीमंतीबरोबरच रिचर्ड हे अभिनेत्रींबरोबर डेट करण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजण्याच्या सवयीमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरले होते.   

4/11

Richard Lugner Death

रिचर्ड लुनगर यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1932 रोजी व्हिएन्ना येथे झाला होता. त्यांनी देशाची राजधानी असलेल्या व्हिएन्ना शहरामध्ये लुनगर सिटी नावाचं शॉपिंग सेंटर उभारलं आणि त्यांचं नाव प्रकाश झोतात आलं.

5/11

Richard Lugner Death

व्हिएन्ना शहरामधील हायप्रोफाइल व्यक्तींमध्ये रिचर्ड लुनगर याचं नाव आवर्जून घेतलं जायचं. अनेकदा ते त्यांच्या गर्भश्रीमंतीसाठी आणि वादग्रस्त विधानांसाठीच चर्चेत असायचे.

6/11

Richard Lugner Death

मागील काही वर्षांमध्ये रिचर्ड लुनगर यांना जागतिक स्तरावर वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धी मिळाली होती. जागतिक स्तरावरील सेलिब्रिटींना रिचर्ड व्हिएन्नामधील ओपेरा बॉल येथे आमंत्रित करायचे. त्यांनी आमंत्रित केलेल्या सेलिब्रिटींमध्ये किम कार्दिशन, सोफिया लोरेन, जेन फोंडा, पामेला अँडर्सन, गोल्डी हावन यांचा समावेश आहे.  

7/11

Richard Lugner Death

2014 मध्ये त्यांनी किम कार्दिशनला डेटवर आमंत्रित करण्यासाठी तब्बल 5 लाख अमेरिकी डॉलर्स दिले होते. ही रक्कम भारतीय चलनानुसार 4 कोटी 19 लाख 37 हजार रुपये इतकी होते. "नियोजित कार्यक्रमांनुसार किम उपस्थित राहत नसल्याने ती मात्र त्रास देतेय असं वाटतंय," असं रिचर्ड लुनगर यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

8/11

Richard Lugner Death

रिचर्ड लुगनर यांनी लिंडसे लोहान या अभिनेत्रीला 2010 च्या ओपेरा बॉल कार्यक्रमामध्ये सोबत करण्यासाठी तब्बल 1 लाख 50 हजार अमेरिकी डॉलर्स (1 कोटी 25 लाख 81 हजार रुपये) मोजले होते. एल्विस प्रेस्लीची पूर्वाश्रमीची पत्नी प्रिसिला प्रेस्ली ही रिचर्ड लुनगर यांची अशी शेवटची सेलिब्रिटी गेस्ट ठरली.

9/11

Richard Lugner Death

रिचर्ड लुनगर हे केवळ उद्योजक नव्हते तर त्यांनी अनेकदा ऑस्ट्रीयाच्या पंतप्रधान पदासाठी निवडणूक लढवली. त्यांना राजकारणात विशेष रस होता. त्यांनी 1990 च्या उत्तरार्धामध्ये ऑस्ट्रीयाच्या पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवली आणि 10 टक्के मतही मिळवली. त्यांनी 2016 मध्येही असाच प्रयत्न केला मात्र ते यावेळेस 2 टक्के मतांसहीत तळाशी राहिले. 

10/11

Richard Lugner Death

रिचर्ड लुनगर यांनी एकूण 6 लग्न केली. त्यांचं शेवटचं लग्न मृत्यूच्या दोन महिन्यांआधी झालं होतं. त्यांनी 42 वर्षीय सिमोन रीलैंडरबरोबर 1 जून रोजी केलं होतं. 'पीपल'शी बोलताना रिचर्ड लुनगर यांनी, 'हे माझं शेवटचं लग्न असेल,' असं म्हटलं होतं. 

11/11

Richard Lugner Death

ऑस्ट्रीयाचे चान्सरल कार्ल नेहामर यांनी रिचर्ड लुगनर यांना आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. "ते फार व्हायब्रंट, ऑस्ट्रीयन मूळ सांगणारे आणि यशस्वी उद्योजक होते. ते कायम स्वत:बरोबर प्रमाणिक राहिले," असं कार्ल यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे. रिचर्ड लुगनर हे एकूण संपत्ती 250 मिलियन युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार 2313 कोटी 18 लाख 83 हजार 402 रुपये इतकी संपत्ती मागे ठेऊन गेले आहेत. (सर्व फोटो- सोशल मीडियावरुन साभार)