हा सागरी किनारा ओला सुगंध वारा... नवी मुंबईतील सिक्रेट समुद्र किनारा

नवी मुंबईत कुठे आहे सुमद्र किनारा? इथं जायचं कसं जाणून घेऊया.

| Aug 17, 2024, 23:58 PM IST

Pirwadi Beach, Uran, Navi Mumbai : नवी मुंबई हे खाडी किनारी वसलेलं शहर आहे. याच नवी मुंबईत एक सिक्रेट समुद्र किनारा आहे. अतिशय सुंदर असा हा समुद्र किनारा असून इथ पर्यटकांची फारशी गर्दी नसते. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर हा समुद्र किनारा असूनही अनेकांना याबद्दल माहिती नाही.  यामुळे या समुद्र किनाऱ्याला एकदा तरी नक्की भेट द्या. 

1/7

 निसर्गरम्य वातावरण, चौफेर अथांग पसरलेला समुद्र.... नवी मुंबईतील या सिक्रेट समुद्र किनाऱ्यावर फिरताना मोहित होऊन जाते.

2/7

उरण पासून 3 ते 4 km अंतरावर हा समुद्र किनारा आहे. रेल्वेने गेल्यास CBD बेलापूर रेल्वे स्थानकात उतरुन रिक्षाने या समुद्र किनाऱ्यावर जाता येते. 

3/7

या समुद्र किनाऱ्याजवळ अनेक प्रसिद्ध मंदिरे तसेच दर्गा देखील आहेत.  

4/7

पिरवाडी बीच हा सनसेटसाठी प्रसिद्ध आहे. संध्याकाळच्या वेळेस सूर्यप्रकाशात समुद्र किनाऱ्यावरची वाळू आणि लाटा सोनेरी रंगात चमकू लागतात.   

5/7

नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे आणि पांढरी वाळू यामुळे या समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून येते. 

6/7

मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील पर्यटकांना पिरवाडी बीच नेहमीच आकर्षित करतो. 

7/7

नवी मुंबईतील हा सिक्रेट समुद्र किनारा म्हणजे उरण येथील पिरवाडी बीच.