World cup: सामन्यापूर्वी 24 तास अगोदर टीमला मोठा धक्का; दुखापतीमुळे कर्णधार बाहेर

न्यूझीलंड क्रिकेट टीमचा कर्णधार केन विलियम्सनची दुखापत काही पाठ सोडण्यास तयार नाहीये. सततच्या दुखापतीमुळे त्रासलेला विलियम्सन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'करो या मरो' सामन्यातून बाहेर पडला आहे. 

Nov 01, 2023, 08:04 AM IST
1/7

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार असून पुण्यात होणाऱ्या या सामन्याला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन मुकणार आहे. 

2/7

न्यूझीलंड क्रिकेट टीमच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून विलियम्सनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आल्याची माहिती देण्यात आलीये.

3/7

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ट्विट केलं की, 'केन विलिमसन बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. विलियम्सनने गेल्या दोन दिवसांत नेटमध्ये फलंदाजी केली असली तरी या सामन्यात त्याला कमबॅक करता येणार नाही. 

4/7

विलियम्सनसारखा फलंदाज आणि कर्णधार मोठ्या सामन्यापूर्वीच बाद होणं हा न्यूझीलंडसाठी मोठा धक्का आहे.

5/7

विलियम्सन दुखापतीमुळे सतत त्रस्त आहे. 2023 च्या वर्ल्डकपमध्येही तो एकच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. 

6/7

13 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने 58 धावांची नाबाद खेळी खेळली होती. यानंतर तो जखमी झाला.

7/7

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तो कमबॅक करेल असं मानलं जात होतं, मात्र तरीही आता तसं होणार नाही. विलियम्सन नेटमध्ये प्रॅक्टिस करतो मात्र मॅनेजमेंटला त्याच्या दुखापतीबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही.