शरद पवार गटाला मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची... पाहा कुणाकडे किती संख्याबळ?

NCP Reslut : निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचं नार्वेकर यांनी म्हटंलय. अजित पवार गटाकडे 53 पैकी 41 आमदार आहेत. विशेष म्हणजे अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र ठरले आहेत. तर शरद पवार गटाचेही आमदार पात्र ठरले आहेत. शरद पवार आणि अजित पवार गटाकडे किती संख्याबळ आहे पाहूयात.

राजीव कासले | Feb 15, 2024, 18:36 PM IST
1/7

अजित पवार गटाकडे 53 पैकी 41 आमदार आहेत. विशेष म्हणजे अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र ठरले आहेत. तर शरद पवार गटाचेही आमदार पात्र ठरले आहेत. 

2/7

विधानपरिषेदत अजित पवार गटाकडे पाच तर शरद पवार गटाकडे चार आमदार आहेत. 

3/7

4/7

निकालावर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी टीका केली आहे. सगळेच पात्र..न्याय मात्र अपात्र - भाग २ हवं तेच घडवून आणले हट्टी राजाने, लोकशाहीला चिरडून हसतोय मोठ्या माजाने... पण शेवटी खरे कोण आणि खोटे कोण? हे अखेर जनतेच्या कोर्टात ठरणारंच आहे... खरी लढाई जनतेच्या कोर्टात होईलच... जनता सत्याच्या अर्थात आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि महाविकास आघाडीच्याच पाठीशी खंबीर उभी राहील.. जनतेच्या कोर्टात गद्दारांना क्षमा नाही, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय.  

5/7

6/7

तर महाराष्ट्र गद्दारांना माफ करणार नाही असा पलटवार शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना काका का या प्रश्नाला कवितेच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिलंय.

7/7

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निवडणुकीसाठी आता शरद पवारांना खुलं आव्हान दिलंय... आता काका का? असं कॅम्पेन सुरू करा अशा सूचना अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या. मात्र हे सांगताना त्यांनी पवारांची थेट स.का. पाटलांशी तुलना केली.