सुखासन मुद्रेत बसून जेवताय? जाणून घ्या काय आहेत फायदे

Eating Is Sukhasana Position : वजन कमी करायचं याचा अर्थ असा नाही की फक्त वर्कआऊट केल्यानं ते होईल. त्याच्यासाठी तुम्हाला योग्य ते डायट देखील फॉलो करावं लागतं. त्यासोबत एक लाइफस्टाईल देखील फॉलो करावी लागते. काही गोष्टी कायमसाठी टाळण्याकडे थोडं लक्ष द्यावं लागतं. फीट राहण्यासाठी आपल्याला जेवण करण्याची पद्धत देखील बदलावी लागते. त्यात सगळ्यात महत्तावाचा म्हणजे सुखासन योग आहे. आता सुखासन योगा कसा करतात आणि त्यानं काय फायदे होतील ते जाणून घेऊया.

Diksha Patil | May 29, 2023, 19:07 PM IST
1/7

सुखासन म्हणजे मांडी घालून जमिनीवर बसने

Best Position Of Eating Is Sukhasana Benefits

सुखासन करायचे असल्यास मांडी घालून बसून जेवण करा. सेलिब्रिटी न्युट्रिशिएनिस्ट रुजुता दिवेकर आणि योग आणि फिटनेस एक्सपर्ट जूही कपूर या दोघी असं करण्याचा सल्ला देतात. यानं लवकर अन्न पचनाची प्रक्रिया होते आणि वजन वाढत नाही. 

2/7

सुखासन पोजीशनमध्ये कसं बसावं?

Best Position Of Eating Is Sukhasana Benefits

तुम्ही डायनिंग टेबलवर देखील सुखासन पोजीशनमध्ये बसू शकतात. दिवसातून एकदा अशा पद्धतीनं जेवण्याचा प्रयत्न करा. तर एकदातरी जमिनीवर मांडी घालून बसून जेवण करा. 

3/7

लक्ष केंद्रित करण्यासाठी फायदे कारक

Best Position Of Eating Is Sukhasana Benefits

तुम्ही मांडी घालून जेव्हा जमिनीवर बसता तेव्हा तुमची बॉडी ही एका चौरसाच्या आकाराची होती. त्यामुळे लक्ष केंद्रित करायला तुम्हाला फायदा होता. 

4/7

पाय किंवा कंबरे खालचा संपूर्ण भाग हा बळकट होतो.

Best Position Of Eating Is Sukhasana Benefits

आपण जर मांडी घालून खाली बसलो तर त्यानं लवचिकपणा वाढतो, आपल्यातील ताकद वाढते. त्यासोबत आपल्या कंबरे खालचा भाग हा मजबुत होतो.  

5/7

मन शांत राहते

Best Position Of Eating Is Sukhasana Benefits

सुखासन म्हणजेच मांडी घालून जर तुम्ही बसलात तर तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला रिलॅक्स वाटेल. त्यामुळे नेहमी जमिनीवर बसून जेवण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. 

6/7

पाठ दुखने होते दूर

Best Position Of Eating Is Sukhasana Benefits

जमिनीवर बसून जेवण केल्यास शरीराच्या अनेक समस्या दूर होतात पण त्यापैकी एक म्हणजे पाठ दुखीची समस्या दूर होते. पाठीचा कणा देखील ताट राहतो. 

7/7

ब्लड सर्क्युलेशन होते सोपे

Best Position Of Eating Is Sukhasana Benefits

मांडी घालून जेवायला बसल्यास शरीरातील ब्लड सर्कुलेशन चांगलं होते आणि तुमच्या स्नायूंवर दाब पडून आराम मिळतो. (All Photo Credit : Pexel)