निसर्गप्रेमींना फिरण्यासाठी वसंत ऋतूमध्ये भारतातील 'हे ' ठिकाणं आहेत बेस्ट

भारतात वसंत ऋतूचा आरंभ मार्च पासून सुरू होतो. थंडी संपून उन्हाळा सुरू होण्याच्या दिवसात वसंत ऋतूचा आरंभ होतो. भारतात  मार्च ते एप्रिल हा काळ वसंत ऋतूचा मानला जातो. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर वसंत ऋतूमध्ये भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या. 

Feb 23, 2024, 16:57 PM IST
1/6

गुलमर्ग ,कश्मीर

थंडी संपून उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याने  बर्फ हळूहळू वितळायला लागतो.त्यामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि किनारी असलेल्या रंगीबेरंगी फुलांनी बहरून गेलेली बाग पाहणं निसर्गप्रेमींना कायम खुणावतं. 

2/6

कूर्ग , कर्नाटक 

कॉफीच्या लागवडीसाठी  कर्नाटकाला ओळखलं जातं.वसंतात कॉफीच्या शेतीला बहर येतो. डोंगरकपारीत कॉफीच्या फुलांच्या सुगंधाने वातावरण अल्हाददायी होतं. 

3/6

उटी, तामिळनाडू

निळ्या रंगाचा डोंगर म्हणजे निलगिरी. पर्वताचं नयनरम्य सौंदर्य पाहण्यास उटीला एकदा नक्की भेट द्या. बरेच गिर्यारोहक इथे जंगलसफारी करण्यासाठी येत असतात.   

4/6

शिलाँग, मेघालय

मेघालयाचा बहुतांश भाग हा ग्रमीण असल्याने इथं अजूनही निर्गाचं मनमोहक रूप अनुभवायला मिळतं. वसंतात शिलाँगमध्ये ऑर्किड फुलांचा बहर असतो. ऑर्किडच्या फुलांचा महोत्सव पाहण्याकरीता जगाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक शिलाँगला भेट देतात.

5/6

मुन्नार, केरळ

देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळचं निसर्गसौंदर्य पावसाळ्या प्रमाणे वसंतातही मोहवणारं असतं. डोंगरदऱ्यातील पक्ष्यांचा किलबिलाट आणि बहरून आलेली वनश्री अनुभवण्यासाठी तुम्ही वसंतात केरळला फिरण्याचा प्लॅन करू शकता.

6/6

श्रीनगर, काश्मीर

भारताचं नंदनवन ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरला वसंतात नक्की भेट द्या. या दिवसात झाडांना पालवी बहरते. निसर्गातील होणाऱ्या बदलामुळे अल्हाददायी  वातावरण अनुभवण्याकरीता काश्मीर उत्तम ठिकाण आहे.