लोकं तुम्हाला भाव देत नाहीत? स्वतःची किंमत वाढवण्यासाठी 10 नियम पाळा

Self Respect : प्रत्येकाला वाटतं की, समाजात आपला एक मान सन्मान असावा. आपल्याला चार-चौघात आदर मिळावा. पण असं होत नाही. त्यामुळे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी 10 नियम आवर्जून पाळा. अवघ्या सात दिवसांत जाणवेल बदल. 

| Feb 23, 2024, 16:28 PM IST

अनेकजण समजात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्नशील असतात. पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. चारचौघात आपल्याला मान सन्मान मिळावा. फक्त आपली चर्चा व्हावी असं अनेकांना वाटतं. पण सत्यात मात्र तसं होत नाही. अशावेळी आवर्जुन हे 10 नियम पाळा. हे नियम तुमचा आत्मविश्वास वाढवेल एवढंच नव्हे तर यामुळे लोकं तुम्हाला किंमत देतील. समाजात एक वेगळा मान निर्माण होईल. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी न चुकता हे 10 नियम पाळा. 

1/10

स्वतःचा आदर करा

 10 Powerful Life Rules

अनेक लोकं स्वतःच स्वतःला मान देत नाही. अशावेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षाच करणे चुकीची आहे. स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वत्वावर प्रेम करणे. स्वतःला मान सन्मान देणे. अनेकदा आपण स्वतःला गृहित धरतो. म्हणजेच आपण आपला आदर करत नाही. आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटतं असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतः बद्दल सकारात्मक विचार करा. 

2/10

बोलावलं नाही तर जाऊ नका

 10 Powerful Life Rules

आपण अनेकदा कुणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलावलं नाही तरी जातो. तर ही चूक कधीच करु नका. कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं. एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावणं आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर असं अजिबात करु नका. कारण यामध्ये लोकं तुम्हाला गृहित धरतात, जे अतिशय चुकीचं आहे. 

3/10

तुमचं प्लानिंग कुणाला सांगू नका

 10 Powerful Life Rules

तुम्ही भविष्याबद्दल काय विचार करता किंवा तुमचं करिअर आणि खासगी आयुष्याबद्दल काय प्लानिंग आहे ते कधीच कुणाला सांगू नका. कारण जर काही अडचण आली आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोकं तुमची खिल्ली उडवतात. ही व्यक्ती फक्त बोलते करत काहीच नाही, असा एक समज होऊन जातो. यामुळे देखील तुम्हाला समाजात मनाचे स्थान मिळत नाही. मात्र तुम्ही कोणतीही गोष्ट कुणालाही न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि आपोआपच समाजात मान वाढतो. 

4/10

स्वतःला दोष देऊ नका

 10 Powerful Life Rules

कधीच स्वतःला दोष देऊ नका. कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचं मान कमी होतो. एवढंच नव्हे तर लोकं देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाहीत. त्यामुळे तुम्हाला वाटलं की, तुमचा एखादा निर्णय चुकला आहे. तरी ते चारचौघात बोलून दाखवू नका. कारण यामुळे तुमचा मान कमी होतो. 

5/10

संघर्ष हा कायम एकट्याचा असतो

 10 Powerful Life Rules

संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा. प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखऱ्यावर पोहोचल्यावर सगळेचजण येतात. अशावेळी हुरळून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा. यामुळेच तुमचं वेगळेपण अधोरेखित होणार आहे. स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीने वाढवा. 

6/10

लोकांपासून अंतर ठेवा

 10 Powerful Life Rules

प्रत्येकवेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका. कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात. मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी. कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलंत तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा. स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे.   

7/10

लोकांना फार महत्त्व देऊ नाका

 10 Powerful Life Rules

अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो. कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोकं डोक्यावर बसतात. अशावेळी स्वतःचा आदर करुन लोकांमध्ये अंतर निर्माण करा. समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान-सन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकतं. त्यामुळे आपण कुणाला किती महत्त्व देतो, याची काळजी घ्याल.   

8/10

असा ओळखा लोकांचा स्वभाव

 10 Powerful Life Rules

लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही सहज वागून जाता मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. अशावेळी पहिलं समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जवळीक साधा. कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसला असेलच. त्यामुळे स्वभाव ओळखा. 

9/10

असा बदला घ्या

 10 Powerful Life Rules

आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो. त्यामुळे शाब्दिक चकमक करण्यात किंवा वाद करण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा तुमची सगळी एनर्जी कामात वळवा. यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल आणि यामुळे समाजात तुमचा मान वाढेल. त्यामुळे बदला घेण्यापेक्षा तुमची उंची वाढवा. 

10/10

आनंदी राहण्याचा मंत्र

 10 Powerful Life Rules

जर तुम्हाला आनंदी राहायाचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की, कोण काय करतंय? याकडे लक्ष देऊ नका. कोण कशासाठी आणि का करतंय? याचा फार विचार करु नका. कारण या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल. तुम्ही तितके जास्त खुश राहाल. त्यामुळे आनंदी राहण्याचा हा कान मंत्र अधिक महत्त्वाचा आहे.