IND vs SA : जुन्या वाघांसमोर नव्या छाव्यांची 'कसोटी', बीसीसीआयने घेतले 10 बेधडक निर्णय!

BCCI take 10 Fearless decision : कोणालाही नाराज करायचं नाही, या फॉर्म्युल्याचा अवलंब करत निवड समितीने चर्चेत असलेल्या जवळजवळ सर्व खेळाडूंना संधी दिली आहे.

| Nov 30, 2023, 23:22 PM IST

India's squad highlights against South Africa : : आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ निवडण्यासाठी पुरुष निवड समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून बीसीसीआयने  (BCCI) काही प्रश्नांवर स्पष्ट संकेत दिले आहेत. 

1/10

विराट कोहली आणि रोहित शर्मा

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आगामी वनडे आणि टी-20 मधून विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयला दोघांनी विनंती केल्याची माहिती समोर आलीये.

2/10

केएल राहुल

केएल राहुल टीम इंडियाचा नवा वनडे कर्णधार असणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये नव्या शिलेदारावर डाव लावला जाईल, अशी शक्यता होती. अशातच आता पांड्याला डावलून केएलचं नाव समोर आलंय.

3/10

रविंद्र जडेजा

रविंद्र जडेजाबाबत देखील मोठा निर्णय घेण्यात आलाय. T20 मध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी जड्डूवर सोपवण्यात आलीये. श्रेयस अय्यरला डावलण्यात आल्याचं पहायला मिळतंय.

4/10

संजू सॅमसन

संजू सॅमसनला साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या वनडे संघात स्थान देण्यात आलं आहे.  एवढंच नाही तर युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचं वनडेमध्ये जोरदार कमबॅक झालंय.

5/10

ऋतुराज गायकवाड

ऋतुराज गायकवाड असा एकमेव खेळाडू आहे, ज्याची साऊथ अफ्रिका दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटसाठी निवड झाली आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये तो खेळताना दिसेल.

6/10

नवे छावे

बीसीसीआयने नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. रिंकू सिंग, साई सुदर्शन आणि रजत पाटीदार यांना वनडे सामन्यांसाठी निवडण्यात आलंय.

7/10

अय्यर इज- बॅक

वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरचं कसोटीत पुनरागमन झालं आहे. त्याचबरोबर वनडेमध्ये देखील खेळताना दिसेल.

8/10

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी संघात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

9/10

तिन्ही फॉरमॅटसाठी तीन कर्णधार

साऊथ अफ्रिका दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटसाठी तीन कर्णधार असणार आहेत. कसोटीसाठी रोहित, वनडेसाठी केएल आणि टी-ट्वेंटीसाठी सूर्या...

10/10

यशस्वी जयस्वाल

यशस्वी जयस्वाल याला टी-ट्वेंटी बरोबरच कसोटी संघात देखील स्थान देण्यात आलंय. त्यामुळे आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.