IND vs SL : श्रीलंका दौऱ्यात 'या' पाच खेळाडूंचं चमकणार नशिब, थेट मिळणार टीम इंडियात एन्ट्री

India Squad Announcement for Sri Lanka Tour : टीम इंडियामध्ये आता मोठे बदल झाले आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध दोन हात करणार आहे. मात्र, पाच असे खेळाडू आहेत, ज्यांना गौतम गंभीर संधी देऊ शकतो.

Saurabh Talekar | Jul 15, 2024, 23:10 PM IST
1/5

केएल राहुल

दुखापतग्रस्त असताना देखील केएल राहुलने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली होती. मात्र, त्याला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली नाही. आता त्याला श्रीलंका दौऱ्यात संधी मिळू शकते.

2/5

श्रेयस अय्यर

कोलकाता नाईट रायडर्सला विजयी करण्यात महत्त्वाचा रोल असणाऱ्या श्रेयस अय्यरला श्रीलंका दौऱ्यात स्थान मिळू शकतं. गौतम गंभीरसोबत श्रेयसची चांगली बॉन्डिंग देखील आहे.

3/5

इशान किशन

वनडेमध्ये द्विशतक ठोकलं तरी स्थान पक्कं होत नसलेल्या इशान किशनला श्रीलंका दौऱ्यात स्थान मिळेल की नाही? हे पाहवं लागणार आहे. एकीकडे 4 युवा सलामीवीर असताना इशानला खालच्या क्रमांकावर खेळावं लागू शकतं.

4/5

यझुवेंद्र चहल

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळाली पण एकही सामना खेळण्याची संधी यझुवेंद्र चहलला मिळाली नाही. अशातच आता युझीचं नशिब श्रीलंकाविरुद्ध तरी चमकणार का?

5/5

मयंक यादव

मागील आयपीएलमध्ये मिळालेला युवा स्टार गोलंदाज मयंक यादव याला श्रीलंका दौऱ्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. तो दुखापतीतून पूर्णपणे बरा देखील झालाय.