Freedom 125: जगातील पहिली CNG बाईक अखेर लॉंच; एकदा टॅंक फूल केला की विषय संपला!

Pravin Dabholkar | Jul 05, 2024, 16:28 PM IST
1/11

Freedom 125: जगातील पहिली CNG बाईक अखेर लॉंच; एकदा टॅंक फूल केला की विषय संपला!

Bajaj Freedom 125 CNG Bike Launch Auto Marathi News

Bajaj Freedom: ज्या बाईकची भारतीय मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते ती बाईक देशात लॉंच झाली. देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी बजाज ऑटोने जगातील आणि देशातील पहिली CNG बाईक आणली आहे. 

2/11

3 व्हेरियंटमध्ये लॉन्च

Bajaj Freedom 125 CNG Bike Launch Auto Marathi News

कंपनीने ही बाईक तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली असून ही बाईक 7 ड्युअल टोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत ही बाईक लॉंच करण्यात आली. 

3/11

CNG आणि पेट्रोलसाठी एकच स्विच

Bajaj Freedom 125 CNG Bike Launch Auto Marathi News

यात विशेष म्हणजे बाईकमध्ये CNG आणि पेट्रोलसाठी एकच स्विच आहे. म्हणजे पेट्रोलवरून सीएनजीवर किंवा सीएनजीवरून पेट्रोलवर जाताना बाइक थांबवावी लागणार नाही. याशिवाय बाइकमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. 

4/11

प्रिमियम लूक

Bajaj Freedom 125 CNG Bike Launch Auto Marathi News

बाईकमध्ये मोठे साइड बॉडी पॅनल आहेत जे बाईकचे सौंदर्य तर वाढवतातच पण सुरक्षितता देखील देतात. स्प्लिट 5-स्पोक डिझाइन अलॉय व्हील्स डिझाइनमुळे बाइकचा प्रिमियम लूक दिसतो. तसेच टिकाऊपणा देखील वाढवतो.

5/11

आरामदायी आणि सुरक्षित

Bajaj Freedom 125 CNG Bike Launch Auto Marathi News

स्टायलिश बेली पॅनमुळे बाइकला आधुनिक आणि स्पोर्टी लुक आलाय.फंक्शनल रिब्ड सीट आणि ग्रॅब रेलमुळे चालकाला आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळतो. 

6/11

125 सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन

Bajaj Freedom 125 CNG Bike Launch Auto Marathi News

जगातील पहिली CNG बाइक असलेल्या बजाज फ्रीडममध्ये कंपनीने 125 सीसी क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 9.5PS पॉवर आणि 9.7Nm टॉर्क जनरेट करते. 

7/11

300 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज

Bajaj Freedom 125 CNG Bike Launch Auto Marathi News

यामध्ये कंपनीने 2 लीटर पेट्रोल फ्युएल टँक आणि 2 किलो क्षमतेची सीएनजी टँक दिली आहे. बाईक पूर्ण टाकीमध्ये (पेट्रोल + CNG) 300 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.

8/11

पर्यावरणासाठीही अधिक फायदेशीर

Bajaj Freedom 125 CNG Bike Launch Auto Marathi News

सीएनजी तंत्रज्ञानामुळे ही बाईक उत्तम मायलेज देईल आणि प्रवाशांना कमी खर्चात प्रवास करण्याची संधी देईल. यासोबतच सीएनजी वाहनांचा वापर पर्यावरणासाठीही अधिक फायदेशीर आहे, ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. 

9/11

कमी वेळेत लोकप्रिय

Bajaj Freedom 125 CNG Bike Launch Auto Marathi News

बजाज फ्रीडम 125 च्या आकर्षक लूकमुळे ती कमी वेळेत लोकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या बाईकचा पहिला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

10/11

इतर ऑटोमोबाईल कंपन्यांसाठीही प्रेरणादायी

Bajaj Freedom 125 CNG Bike Launch Auto Marathi News

बजाजची ही नवीन बाईक पर्यावरण रक्षणाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या सीएनजी बाईकच्या माध्यमातून प्रदूषण कमी करण्याचा आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. आगामी काळात इतर ऑटोमोबाईल कंपन्यांसाठीही हे प्रेरणादायी पाऊल ठरू शकते.

11/11

75 हजार वाचवाल

Bajaj Freedom 125 CNG Bike Launch Auto Marathi News

या बाईकची रनिंग कॉस्ट कोणत्याही पेट्रोल मॉडेलपेक्षा खूपच कमी असल्याचा दावा बजाज ऑटोने केला आहे. इतर बाईकच्या तुलनेत तुमचा 50 टक्के खर्च वाचू शकतो. म्हणजेच बाईकच्या मालकाचे 5 वर्षात अंदाजे 75 हजार रुपये वाचू शकतात.