Baby Names on Nakshatra : 'कृतिका' नक्षत्रावरुन ठेवा मुला-मुलींची नावे; बाळाचे नक्षत्र कसे ओळखावे?

Baby Names on Nakshatra : पालक मुलांसाठी वेगवेगळ्या नावांचा विचार करतात. अशावेळी मुलांच्या जन्मावेळेचे नक्षत्र त्याच्यावर कायमच प्रभाव करत असते. अशावेळी कृतिका नक्षत्रावरुन मुला-मुलींची नावे पाहूया. 

मुलांसाठी नाव निवडणे हा पालकांसाठी आता खूप मोठा टास्क असतो. कारण मुलाच्या जन्मानंतरची त्याची पहिली ओळख असते त्याचं नाव. अशावेळी पालक नावे ठेवताना वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतात. जसे की, पालकांच्या नावांच्या कॉम्बिनेशनवर मुलांची नावे किंवा देवाच्या नावावरुन मुलांची नावे ठेवली जातात. पण जर तुम्ही जन्माच्या नक्षत्रावरुन मुला-मुलींची नावे ठेवू इच्छिता तर आज आपण 'नक्षत्रावरुन मुला-मुलींची नावे' या सिरीजमध्ये 'कृतिका नक्षत्र' यावरुन मुलांची नावे आणि अर्थ पाहणार आहोत. 

1/8

नक्षत्र म्हणजे काय?

जन्म नक्षत्र, ज्यांना इंग्रजीमध्ये जन्म तारे देखील म्हणतात, हे भारतीय ज्योतिषशास्त्राचा एक प्रमुख भाग आहेत. चंद्र आकाशात फिरत असताना, तो 27 खंडांमधून किंवा 'चंद्र ग्रहां'मधून जातो असे मानले जाते. प्रत्येक चंद्राच्या घरात एक प्रमुख नक्षत्र किंवा तारा असतो. या 27 घरांना भारतीय ज्योतिषशास्त्रात 'नक्षत्र' म्हणून ओळखले जाते आणि प्रत्येक घराचे नक्षत्र किंवा प्रबळ तारेवरून त्याचे नाव मिळाले आहे. जे ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात ते म्हणतात की, नक्षत्र तुम्हाला बाळाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगू शकतात आणि नवजात बाळासाठी योग्य नाव निवडण्यात मदत करू शकतात. म्हणूनच अनेक भारतीय पालक आपल्या बाळाच्या जन्मानंतर लगेचच त्याचे नक्षत्र शोधण्यासाठी ज्योतिषाचा सल्ला घेतात.

2/8

बाळाचे नक्षत्र कसे कळेल?

बाळाचे नक्षत्र शोधण्यासाठी तुम्हाला त्याच्या जन्माची वेळ आणि ठिकाण आवश्यक असेल. हे तपशील ज्योतिषाला बाळाच्या जन्माच्या वेळी आकाशातील चंद्राच्या स्थितीची गणना करण्यास मदत करतात आणि अशा प्रकारे त्याचे नक्षत्र शोधतात. ही माहिती ज्योतिषांकडे घेऊन गेल्यास ते जन्मपत्रिका तयार करतात. तुम्हाला तुमच्या बाळाच्या जन्माच्या वेळी सर्व ग्रहांची स्थिती तसेच बाळाचे नक्षत्र सांगेल. जर तुम्ही एखाद्या ज्योतिषाला बाळाचे भविष्य सांगण्यास किंवा त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगण्यास सांगितले तर तो/ती सर्व ग्रह आणि नक्षत्रांची माहिती गोळा करून निष्कर्षापर्यंत पोहोचेल. म्हणूनच नक्षत्र हे भारतीय ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहेत. परंतु हे असे भाग आहेत जे तुम्हाला बाळाचे योग्य नाव शोधण्यात मदत करतात. (हे पण वाचा -Baby Names on Nakshatra : 'भरणी' नक्षत्रावरुन मुला-मुलींची नावे आणि अर्थ)

3/8

कृतिका नक्षत्रासाठी लहान मुलांची नावे-अर्थ

आकाश - 'आकाश' या नावाचा अर्थ आहे नभ. नक्षत्र हे आकाशात असतात त्यानुसारमुलावर त्याचा परिणाम होतो.  आरुष - सूर्याचे पहिले किरण, शांत, लाल, तेजस्वी आणि सूर्याचे दुसरे नाव असा 'आरुष' या नावाचा अर्थ आहे.  आत्रेय - एका ऋषीचे नाव; हुशार; वैभवाचे ग्रहण असे 'आत्रेय' नावाचा अर्थ आहे. 

4/8

मुलांची नावे आणि अर्थ

अभिज्ञान - या नावाचा अर्थ आहे ज्ञानाचा स्त्रोत किंवा शहाणपणा असा आहे. मुलासाठी हे नाव अतिशय युनिक आहे.  एकंठ - 'एकंठ' या नावाचा अर्थ आहे एकटा. अनेक मुलं शांत स्वभावाची असतात त्यांच्याशी या नावाचा विचार करायला हरकत नाही.  अर्नित - 'अर्नित' या नावाचा अर्थ आहे शक्तीचा पर्वत किंवा गरुड शक्ती.  (हे पण वाचा - Baby Names on Nakshatra : 'अश्विनी' नक्षत्रावरुन मुला-मुलींची नावे आणि अर्थ) 

5/8

कृतिका नक्षत्रावरुन मुलांची नावे-अर्थ

इक्षा - पंख, पाहणे, दूर दृष्टी,भेटणे" किंवा "जो शोधत आहे असा 'इक्षा' या नावाचा अर्थ देखील आहे.  एहसान - 'एहसान' या नावाचा अर्थ होतो कृपा, परोपकार, दयाळूपणा, चांगले, चांगुलपणा, जो दयाळू आहे, आणि जो एकतेवर विश्वास ठेवतो.  इशरित - 'इशरित' या नावाचा अर्थ आहे देवाशी संबंधित, भरभरून आनंद. मुलासाठी या नावाचा विचार करायला हरकत नाही.  ऊर्जित - शक्तिशाली, बलवान, पराक्रमी, थोर, महान असा 'ऊर्जित' या नावाचा अर्थ आहे. 

6/8

कृतिका नक्षत्रासाठी लहान मुलींची नावे:

आक्षी - 'आक्षी' हे दोन अक्षरी सुंदर नाव आहे. ज्याचा अर्थ आहे सुंदर डोळे.  अरिणी - साहसी, जी व्यक्ती साहसी असा आहे. ज्या पालकांना वाटते आपल्या मुलीने अतिशय साहसी असावे.  आंचल - निवारा असा या नावाचा अर्थ आहे. जो हलवता येत नाही किंवा व्हॅली असा देखील याचा अर्थ आहे. 

7/8

कृतिका नक्षत्रावरुन मुलांची नावे-अर्थ

अवंतिका - मोहक, सुंदर, उदात्त असा या नावाचा अर्थ आहे. 'अवंतिका' हे मराठमोळ नाव अतिशय लोकप्रिय आहे.  एकथा  - 'एकथा' हे नाव युनिटी, एकजूट अशी आहे. या नावाचा अर्थ अतिशय खास आहे.  इरा - 'इरा' हे दोन अक्षरी नाव अतिशय सुंदर आहे. या नावाचा अर्थ आहे आनंददायक, भाषणाची देवी, उत्तम वकृत्त्व असलेले गुण या मुलीमध्ये असतील. 

8/8

कृतिका नक्षत्रावरुन मुलांची नावे-अर्थ

ईशान्या - पूर्व किंवा ईशान्य असा या नावाचा अर्थ आहे. ईशान्या हे नाव युनिक आहे.  ओरजा - ऊर्जा किंवा चैतन्य असा या नावाचा अर्थ आहे. ओरजा हे नाव युनिक आहे.  ओरवी - ओरवी या नावाचा अर्थ आहे पृथ्वी. हे नाव युनिक आणि ट्रेंडी आहे.  उदयांजली - 'उदयांजली' असा या नावाचा अर्थ युनिक आहे. सद्गुणी असा अर्थ आहे. पाच अक्षरी नाव असलं तरीही त्याचा अर्थ खास आहे.