स्वातंत्र्य दिनी जन्मलेली मुलं नावामुळे ठरतील खास, अर्थ जो देशाशी निगडीत

15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. या दिवशी जन्मलेली मुलं असतात अतिशय खास. या दिवशी जन्मलेल्या मुलांसाठी निवडा अतिशय खास अशी नावे. 

| Aug 15, 2024, 11:37 AM IST

आज संपूर्ण देश 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं याचा आनंद आहेच पण यासोबतच जर घरी चिमुकल्या पावलांचा जन्म झाला असेल तर हा आनंद द्विगुणित होईल यात शंका नाही. अशावेळी तुम्ही खालील नावांचा नक्कीच विचार करु शकता. यामध्ये मुला-मुलींची युनिक अशी मॉडर्न नावे देण्यात आली आहेत. तसेच या नावांचा अर्थ देखील अतिशय खास आहे. 

1/7

सदगति

जर मुलीचा जन्म 15 ऑगस्ट रोजी झाला असेल तर तुम्ही तिच्यासाठी 'सदगति' हे नाव निवडू शकता. या नावाचा अर्थ आहे स्वतंत्रता आणि आझादी. 

2/7

अनया

15 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या मुलीसाठी 'अ' अक्षरावरुन निवडा नाव. या नावाचा अर्थ आहे मुक्त होणे, स्वातंत्र्य होणे, कुणाचेही बंधन नाही असा. हे नाव अतिशय युनिक आहे. 

3/7

शर्लिन

गोंडस परिचा जन्म जर 15 ऑगस्ट रोजी झाला असेल तर त्यासाठी अर्थपूर्ण आणि मॉडर्न असं नाव निवडा. शर्लिन हे नाव अतिशय खास ठरु शकतं. या नावाचा अर्थ आहे, अशी महिला जीचं स्वातंत्र्यावर भरभरून प्रेम आहे. 

4/7

आर्थिका

स्वातंत्र्य दिनी जन्मलेल्या मुलीसाठी निवडा अर्थपूर्ण नाव. आर्थिका असं नाव तुम्ही मुलीसाठी निवडू शकता. प्रेम आणि स्वातंत्र्य असा या नावाचा अर्थ आहे. 

5/7

स्वराज

आझादी, स्वतंत्र्यतेशी निगडीत असं हे मुलासाठी दुसरं नाव आहे. 'स्वराज' असे हे नाव असून याचामध्ये एक वेगळा उत्साह आहे. 

6/7

स्वतंत्र

15 ऑगस्ट रोजी जन्मलेल्या मुलांसाठी 'स्वतंत्र' असं नाव देखील निवडू शकता. स्वातंत्र्य हे दोन पद्धतीचे असते. 1947 मिळालेलं स्वातंत्र्य हे इंग्रजांकडून होतं. तर आता आपल्याला नकारात्मक गोष्टींकडून स्वातंत्र्य हवं आहे. 

7/7

तरण

तरण असं देखील एक नाव मुलासाठी निवडू शकता. या नावाचा अर्थ आहे मुक्ती. आताच्या काळात नकारात्मक विचारांपासून मिळालेली मुक्ती असा याचा अर्थ आहे.