टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचं 'पॅकअप', Babar Azam सोडणार कॅप्टन्सी? स्वत: केला खुलासा

Babar Azam On Resign From Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचं पॅकअप (T20 World Cup 2024) झालंय. पाकिस्तानने आयर्लंडचा 3 विकेट्सने पराभव केला अन् शेवट गोड केला. 

| Jun 17, 2024, 18:59 PM IST
1/7

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या संपूर्ण टीमची कामगिरी खराब राहिलीये. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड देखील खेळाडूंवर नाराज आहे.

2/7

कॅप्टन्सी काढून घ्या

पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर होताच, बाबर आझमकडून कॅप्टन्सी काढून घ्यावी आणि काही खेळाडूंना नारळ द्यावा, अशी मागणी होताना दिसत आहे. 

3/7

नेमकं काय म्हणाला बाबर?

अशातच आयर्लंड सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कॅप्टन बाबर आझम याने कॅप्टन्सी सोडण्याबाबत मोठं वक्तव्य केलं. नेमकं काय म्हणाला बाबर?

4/7

कर्णधारपद

जेव्हा मी याआधी कॅप्टन्सी सोडली होती, तेव्हा मी मला वाटलं की मला आता पुन्हा कर्णधारपद स्विकारू नये. त्यामुळे मी स्वत: त्याची घोषणा केली होती, असं बाबर म्हणतो.

5/7

पीसीबी

मला पीसीबीने पुन्हा बोलवलं होतं, हा त्यांचा निर्णय होता. आता आम्ही पुन्हा गेल्यावर यावर नक्की चर्चा करू, असं बाबर आझमने म्हटलं आहे.

6/7

अद्याप निर्णय नाही

जर मी कॅप्टन्सी सोडली तर मी तुम्हाला सर्वांना कळवेल. याबाबत मी अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही आणि विचार केला नाही, असंही बाबर आझम म्हणाला.

7/7

पीसीबीकडे अधिकार

त्यावेळी आता पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार हा पीसीबीकडे असेल, असं म्हणत बाबरने पीसीबीच्या हातात निर्णय सोपवला आहे.