Ayodhya Ram Mandir Inauguration : बॉलीवूडच्या फक्त 'या' सेलिब्रेटींना अयोध्येतून बोलावणं; यादी आली समोर, पाहा PHOTO

Ayodhya Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिराची तयारी जोरात सुरु आहे. श्री रामाचे बाल रुप रामललाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. अयोध्येत 70 एकर जागेवर राम मंदिर बांधले जात आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित केले आहे. या यादित 3 हजार व्हीआयपींसह एकूण 7 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.    

| Dec 29, 2023, 11:34 AM IST

Ayodhya Ram Mandir Opening Date : अयोध्या राम मंदिराचा अभिषेक लवकरच होणार आहे. संपूर्ण भारतीय जनता या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. अयोध्या नव्याने बांधलेल्या रामलल्लची मूर्तीचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे. या उद्धाटनाला ट्र्स्टने 3000 व्हीव्हीआयपींसह 7000 लोकांना आमंत्रणे पाठवली आहेत. या तयारींचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः 30 डिसेंबरला पुन्हा एकदा अयोध्येला भेट देणार आहेत. तेथे ते नूतनीकरण केलेल्या अयोध्या रेल्वे स्थानकाचे आणि नवीन विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर 22 जानेवारीला श्री रामाचे बाल रुप रामललाचा अभिषेक सोहळा होणार आहे. यात सहभागी होण्यासाठी चित्रपटसृष्टी, क्रीडा आणि राजकारणातील व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

 

1/7

बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित केले आहे. या यादित बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांना प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे.   

2/7

अभिनेता प्रभास

या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'आदिपुरुष'मध्ये भगवान श्री रामची भूमिका साकारणाऱ्या प्रभासलाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. प्रभाशिवाय धनुष, ऋषभ शेट्टी आणि मोहनलाल यांनाही आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

3/7

अभिनेत्री आलिया भट्ट

'रामायण'मध्ये रामाची भूमिका साकारणारा नितेश तिवारी, रणबीर कपूर आणि अभिनेत्री पत्नी आलिया भट्टही 'प्राण प्रतिष्ठा' कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यासाठी या जोडप्यांना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

4/7

सुपरस्टार रजनीकांत

सुपरस्टार रजनीकांत यांनाही 'प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम'मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. रजनीकांतचे संपूर्ण भारतात चाहते आहेत. यावर्षी त्याने 'जेलर' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन लोकांच्या मनावर राज्य केले.  

5/7

सुपरस्टार चिरंजीवी

सुपरस्टार चिरंजीवी देखील या 'प्राण प्रतिष्ठा' कार्यक्रमाचा एक भाग असणार आहेत. चिरंजीवीला उत्तर आणि दक्षिण भारतातही खूप आवडते. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. यावर्षी तो 'गॉडफादर' या चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये सलमान खानने कॅमिओ केला होता.  

6/7

अभिनेत्री माधुरी दीक्षित

'प्राण प्रतिष्ठा' कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओल, टायगर श्रॉफ, अजय देवगण आणि आयुष्मान खुराना यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या यादीत आयुष्मान आणि टायगर श्रॉफ यांचा समावेश असणार आहे. 

7/7

अभिनेत्री दीपिका चिखलियाला

रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये सीतेची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या दीपिका चिखलियालाही 'प्राण प्रतिष्ठा' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, आता देशातील मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये कोणते स्टार्स सहभागी होतात हे पाहणे बाकी आहे.