आजही नीता अंबानींची मुलं करतात 'या' 4 कडक नियमांचं पालन; उगाचच नाही श्रीमंती टिकत!
Nita Ambani Parenting Tips : गडगंज श्रींमत असलेले अंबानी कुटूंब आजही स्वतःच वेगळेपण जपून आहे. मग ते व्यवसायात असो किंवा घरच्या गोष्टींमध्ये. नीता अंबानी यांचे काही नियम जे पालकत्वासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतात.
नीता अंबानी या नावाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. प्रत्येक क्षेत्रात नीता अंबानी यांनी स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलंय. मग ते व्यावसायिक क्षेत्रात असो किंवा सोशल मीडिया असो. नीता अंबानी आपल्या व्यस्त शेड्युलमधून मुलांवर कायमच संगोपन करताना दिसतात. त्यांच्या तिन्ही मुलांना दिलेली शिकवण ही अतिशय खास आहे. या मुलांनी आईने लावलेले कडक नियम मनापासून अगदी आतापर्यंत फॉलो केले आहेत.
1/6
कडक नियम
नीता अंबानी मुलांसाठी अतिशय कडक शिस्तीच्या आहे. त्यांच्या नियमांनुसार मुलांनी वेळेत जेवावे, अभ्यास करावा आणि खेळातही तेवढाच रस घ्यावा. नीता अंबानी यांनी मुलांना वेळेचे महत्त्व पटवून दिले. आज वेळेची किंमत तुम्ही केलात तर उद्या वेळ तुम्हाला किंमत देईल, असं त्या म्हणतात. ईशा अंबानीने एका मुलाखतीत सांगितले होते की, कधी वडील मुकेश अंबानी यांच्याकडून सहज परवानगी मिळायची पण आई नीता अंबानी कायमच सगळी चौकशी करून विचार करून मगच परवानगी द्यायच्या.
2/6
मुकेश अंबानीही टाळत नाहीत हे नियम
मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी कायमच आपल्या मुलांच्या बाबतीत अतिशय सतर्क असतात. एका बाजूला पॅरेंटिंगच्या नियमांमध्ये नीता अंबांनी फार कडक शिस्तीच्या आहेत तर दुसरीकडे मुलांची काळजी घेतानाही त्या मागे पुढे पाहत नाहीत. एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी खुलासा केला होता की, त्यांची तिन्ही मुले अतिशय सामान्य जीवन जगतात. श्रीमंत आणि अतिशय चर्चेत कुटुंब असलं तरीही त्या मुलांना काही अटी लागू करण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांनी घरात काही नियम लागू केलेत. महत्त्वाचं म्हणजे हे नियम अंबानी कुटुंबाचे प्रमुख मुकेश अंबानी देखील पाळतात.
3/6
पैशाचे महत्त्व
अंबानी हे अतिशय गडगंज श्रीमंत कुटुंब आहे. असं असलं तरीही नीता अंबानी यांनी तिन्ही मुलांना पैशाचे महत्त्व शिकवलं आहे. यामुळे मुलांच्या डोक्यावर पैशाची नशा नाही. नीता अंबानी मुलांसाठी पॉकेटमनी देत असतं. त्या पैशातच त्यांनी आपला खर्च करावा असा नियम लागू करण्यात आला होता. यामुळे मुलं कायमच पैशाला महत्त्व देतात.
4/6
मुलांसोबत खंबीरपणे उभे राहणे
5/6
हॉस्टेल जीवनाचा अनुभव
आपल्या तिन्ही मुलांना सामान्य माणसांच्या आयुष्याचे महत्त्व कळायला हवे यासाठी मुकेश आणि नीता अंबानी यांनी आपल्या तिन्ही मुलांना पुढील शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये ठेवले होते. ईशा अंबानीला त्यावेळी 18/20 मुलींसह बाथरूम शेअर करण्याचा अनुभव आल्याचे सांगितले. आकाश, ईशा आणि अनंत यांना प्रवासासाठी कधीही प्रायव्हेट प्लेन पाठविण्यात आले नाही तर त्यांनी नियमित सामान्य माणसाप्रमाणे साध्या विमानानेच प्रवास केला ज्यामुळे काय अडचणी येऊ शकतात याची जाणीव त्यांना झाली.
6/6