रामलल्लाचं भव्य मंदिर, गर्भगृह आणि प्राणप्रतिष्ठा... 10 फोटोमध्ये पाहा अयोध्येचं सौंदर्य

भारतासह जगभरातील रामभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते, तो क्षण अखेर संपूर्ण जगाने याची देही, याची डोळा अनुभवला. अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांसह हजारोच्या संख्येने रामभक्त उपस्थित होते. या सोहळा ऐतिहासिक बनवण्यासाठी अयोध्या नगरी फुलांनी सजली होती. 

राजीव कासले | Jan 22, 2024, 13:58 PM IST

भारतासह जगभरातील रामभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते, तो क्षण अखेर संपूर्ण जगाने याची देही, याची डोळा अनुभवला. अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांसह हजारोच्या संख्येने रामभक्त उपस्थित होते. या सोहळा ऐतिहासिक बनवण्यासाठी अयोध्या नगरी फुलांनी सजली होती. 

1/10

500 वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली. अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली, यावेळी त्यांच्याबरोबर उत्त प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानात, संघप्रमुक मोहन भागवत गर्भगृहात उपस्थित होते. 

2/10

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने देशभरात उत्सवाचं वातावरण आहे. देशभरातील वातावरण राममय झालं आहे. देशातील शहरा-गाव आणि गल्लोगलीत रामभक्त रामनामात तल्लीन झाले आहेत. मोठमेठे पोस्टर्स आणि होर्डिंग लावण्यात आले आहेत. कारवर, दुचाकीवर, घराघारत श्रीरामाचे झेंडे फडकवण्यात आलेत.   

3/10

या ऐताहिसक क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज अयोध्येत उपस्थित होते. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी, उद्योगपती गौतम अदानी, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, बॉलिवूड कलाकार रणबीर कपूर, आलिया भट, कतरीना कैप उपस्थित होते. 

4/10

अयोध्या नगरीतलं वातावरण या सोहळ्याने भारावून गेलं आहे. रस्त्या-रस्त्यावर, कोपरानकोपर रामनामाने सजला आहे. चौकाचौकात भागवत कथा, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे 

5/10

पीएम मोदी यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला असून सोहळ्यासाठी आलेले प्रमुख अतिथी रामलल्लाचं दर्शन करतील.

6/10

देशातील विविध भागातून अनेक रामभक्त अयोघ्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत सुंदरकांड, अखंड रामायण पाठचं आयोजन करण्यात आलं आहे, रामभक्तांसाठी ठिकठिकाणी भंडाऱ्याची व्यवस्था करण्यात आली असून दिवाळ सणाचं वातावरण आहे. 

7/10

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने अयोध्येत आलेल्या भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भाविक रामनामाच्या गजरात तल्लीन झाले आहेत. 

8/10

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी हेलिकॉप्टरमधून अयोध्येत पुष्पवृष्टी करण्यात आली. 

9/10

अयोध्या परिसरात 30 कलाकारांकडून भारतीय वाद्यांचं वादन करण्यात आलं. तसंच रामनामाचा जप करण्यात आला. 

10/10

अयोध्येत भगवान राम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुनामाच्या रुपात लोकं तयार होऊन रस्त्यावर दिसत आहेत. संपूर्ण वातावरण मंत्रगमुग्ध झालंय.