'या' आघाडीच्या कारने गाठला 5 लाख युनिट्सच्‍या विक्रीचा टप्‍पा, ऑटोमोबाईल क्षेत्रात नवा विक्रम

Automobile : आकर्षक लूक आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे टाटा मोर्टर्स कंपनीच्या टियागो कारने वाहन विक्रित मोठा टप्पा गाठला आहे. विशेषता तरुण वर्गात टियागो कारची प्रचंड लोकप्रयित दिसून आली आहे.

राजीव कासले | Jul 07, 2023, 17:17 PM IST
1/5

मुंबई : टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल (Automobile) उत्‍पादक कंपनीच्या टियागो (Tiago) कारने 5 लाक युनिट्सच्या विक्रीचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. कंपनीने ही घोषणा केली आहे. शेवटच्‍या 1 लाख युनिट्सची विकी अवघ्‍या 15 महिन्‍यांमध्‍ये झाली आहे. वेगवान आणि आरामदायी ड्रायव्हिंगची आवड असणाऱ्या ग्राहकांमध्ये टियागो खरेदी करणाऱ्यावर वाढता कल आहे. टियागोचं होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमधील सानंद केंद्रावर या निमित्ताने सेलिब्रेशन करण्यात आलं. 

2/5

टियागो कारने 40 हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले आहेत. आकर्षक डिझाझन, सुरक्षितता, लक्षवेधी इंटीरिअर्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या वैशिष्ट्यांमुळे तरुण वर्गात ही कार प्रचंड लोकप्रिय झाली आहे. टियागो श्रेणी पेट्रोल, सीएनजी व इलेक्ट्रिक अशा विविध पॉवरट्रेन पर्यायांमध्‍ये येते. टियागो एआरजी एसयूव्ही डिझाइन ऑफ रोडिंग क्षमतांसह येते. ही कारही पेट्रोल आणि सीएनजी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. टियागोच्‍या नेट प्रमोटर स्‍कोअरला 51 चं सर्वोच्‍च रेटिंग मिळालं आहे. यातच ब्रँडचं मोठं यश दिसून येतं. 

3/5

टियागोने कंपनीच्या न्यू फॉरेव्हर श्रेणीच्या लोकप्रियतेत महत्तावाची भूमिका बजावली आहे.  टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लिमिटेडचे विपणन प्रमुख विनय पंत यांनी ही माहिती दिली आहे. उत्तम स्टाईल, सुरक्षिततेचं मानक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान देत तसंच हॅच विभागाला नवा आकार देत टियागोने ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता केली आहे. 

4/5

तरुणवर्गात टियागोची प्रचंड लोकप्रियता आहे. टियागोच्या ग्राहकाचं सरासरी वय 35 इतंक आहे. टियागोची 60 टक्के विक्री शहर तर 40 टक्के विक्री ग्रामीण बाजारपेठेत झाली आहे. इतकंच नाही तर महिला वर्गातही टियागोबद्दल सकारात्मक मागणी आहे. 10 टक्के विक्रिमध्ये महिला ग्राहक आहेत. विशेष म्हणजे आपली पहिली कार म्हणून टियागोला प्राधान्य देण्याऱ्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. 2023 मध्ये पहिल्यांदा कार खरेदी केलेल्या ग्राहकांमध्ये टियागो खरेदी केलेले ग्राहक 71 टक्के इतके आहेत. 

5/5

टियागोनो लाँचिंगपासूनच मैलाचा दगड गाठला आहे. जानेवारी 2020 मध्‍ये टियागोला जीएनसीएपीकडून 4 स्‍टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे, तसंच ही कार सर्वात सुरक्षित हॅच ठरली आहे. आकर्षक लूक आणि सुरक्षिततेमुळे टियागो तरुण आणि पहिली कार घेणाऱ्या ग्राहकांसाठी पसंतीची हॅचबॅक ठरली आहे.