फडणवीसांना पायाने टिळा लावणारी 'ती' कोण? गर्भात असतानाच पालकांना कळलं तिला हात नसतील पण...

The Girl Who Applied Tilak To Devendra Fadnavis By Her Leg: देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिल्याचं त्यांनीच एका सोशल मीडिया पोस्टमधून सांगितलं होतं. मात्र फडणवीस यांना पायाने टिळा लावणाऱ्या या तरुणीला जन्मापासूनच हात नाहीत. पण ही तरुणी नेमकी आहे तरी कोण? तिचा संघर्ष वाचून तुम्हालाही नक्कीच प्रेरणा मिळेल पण डोळ्यात पाणीही येईल. जाणून घेऊयात या मुलीबद्दल....

Swapnil Ghangale | Jul 07, 2023, 15:54 PM IST
1/10

The Girl Who Applied Tilak To Devendra Fadnavis By Her Leg

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पायाने औक्षण करणारी जळगावमधील तरुणीचा फोटो पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. मात्र ही तरुणी नेमकी आहे कोण तुम्हाला ठाऊक आहे का? तिची संघर्ष कथा वाचून तुम्हाला नक्कीच तिचा अधिक अभिमान वाटेल यात शंका नाही.

2/10

The Girl Who Applied Tilak To Devendra Fadnavis By Her Leg

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 27 जून रोजी जळगावचा दौरा केला. यावेळी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या दीपस्तंभ फाऊंडेशनच्या ‘मनोबल’ संस्थेमध्ये फडणवीस यांचं खास स्वागत झालं.

3/10

The Girl Who Applied Tilak To Devendra Fadnavis By Her Leg

फडणवीस यांचं औक्षण एका दिव्यांग मुलीने केलं. हे औक्षण पाहून फडणवीस यांनाही अश्रू अनावर झाले. फडणवीस यांनीच काही फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली होती.

4/10

The Girl Who Applied Tilak To Devendra Fadnavis By Her Leg

या मुलीकडून पायाने माथ्यावर टिळा लावून घेताना फोटो शेअर करत फडणवीस यांनी, "आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं," असंही म्हटलं होतं.

5/10

The Girl Who Applied Tilak To Devendra Fadnavis By Her Leg

"आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे," असं शब्दांमध्ये फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

6/10

The Girl Who Applied Tilak To Devendra Fadnavis By Her Leg

या मुलीच्या संघर्षाचं कौतुक करताना फडणवीस यांनी, "तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की "तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे," असे शब्द वापरले होते.

7/10

The Girl Who Applied Tilak To Devendra Fadnavis By Her Leg

फडणवीस यांनी पोस्टच्या शेवटी, "ते पाहून मी इतकंच म्हणालो, "ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले - अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!" असंही म्हटलं.

8/10

The Girl Who Applied Tilak To Devendra Fadnavis By Her Leg

फडणवीस यांना पायाने टिळा लावणाऱ्या मुलीचं नाव लक्ष्मी शिंदे असं आहे. "जेव्हा मी गर्भात होती तेव्हाच तिला दोन्ही हात नसतील असं डॉक्टरांनी सांगत, गर्भ पाडण्याचा सल्ला दिला होता. मात्र 'ही मुलगी म्हणजे मला देवाने दिलेली भेट आहे. मी ती नाकारु शकत नाही. ती जशी आहे तसा मी तिचा स्वीकार करेन, असं वडिलांनी सांगितलं," अशी माहिती लक्ष्मीनेच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत दिली.

9/10

The Girl Who Applied Tilak To Devendra Fadnavis By Her Leg

लक्ष्मीचे वडील रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. त्यांनी मला शिकवून माझ्या पायांवर उभं केलं. माझ्या पालकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी बीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. तसेच मी कधीच परीक्षा देताना रायटरची मदत घेतली नाही, असं लक्ष्मी म्हणाली. लक्ष्मी पायात पेन पकडून अगदी सामान्य व्यक्तींप्रमाणे प्रचंड वेगात लिहू शकते.

10/10

The Girl Who Applied Tilak To Devendra Fadnavis By Her Leg

पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकताना पायाला जखम झाल्यानंतरही तिने स्वत:च पेपर लिहिला. तिने या परीक्षेत 65 टक्के गुण मिळवले. सध्या लक्ष्मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.