Lamborghini ने भारतात लाँच केल्या दोन तूफान कार, टॉप स्पीड 305KMPH

Lamborghini Urus S: कार असावी तर Lamborghini सारखी, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आता लॅम्बॉर्गिनीने दोन नव्या मॉडेल लाँच केल्या आहेत. याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. भारतात Lamborghini Urus S कार 4.18 कोटी रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आली होती. आता याच सीरिजमधल्या दोन मॉडेल भारताच लाँच झाल्या आहेत. 

Apr 13, 2023, 19:33 PM IST
1/5

Lamborghini ही जगातील सर्वात वेगवान आणि महागडी कार समजली जाते. या कारची किंमत कोट्यवधींच्या घरात असते. आता भारतात Lamborghini Urus Performante आणि Lamborghini Urus S. Urus Performante या दोन मॉडेल लाँच करण्यात आल्या आहेत. या कारची किंमत 4.22 कोटीपासून सुरु होते. 

2/5

मार्केटमध्ये सध्या असलेल्या महागड्या बीएमडब्ल्यू एक्सएम, एस्टन मार्टिन डीबीएक्स 707, मासेराती लेवांते ट्रोफियो, ऑडी आरएसक्यू 8  आणि पोर्श केयेन टर्बो जीटी या कारना Lamborghini Urus सीरिजच्या कार तगडी टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्यात. यात 4.0L, ट्विन टर्बो V8 इंजिन देण्यात आलं आहे. 

3/5

Lamborghini Urus या कारचं S666bhp आणि 850Nm इतकं आऊटपूट आहे. या कारचा वेग 3.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रती तास इतका प्रचंड आहे. Urus Performante कार या पेक्षा वेगवागन आहे. हाच वेग 3.3 सेकंदात पूर्ण करते.

4/5

Lamborghini Urus S मध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहेत. याचे एअर सस्पेंशनही जबरदस्त आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ही कार वापरण्यासाठी एकदम सोपी आहे. उरुस एस चा टॉप स्पीड 305 किमी प्रती तास इतका आहे. उउस एसच्या जुन्हा मॉडेलपेक्षा नव्या मॉडेलमध्ये अधिक लक्झरी सुविधा देण्यात आल्या आहेत. 

5/5

Lamborghini Urus S कार मध्ये बाहेरच्या आणि आतल्या इंटेरिअरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यात न्यू फ्रंट बंपर आणि 21 इंचाचे अलॉय व्हील स्टॅंडर्डची सुविधा देण्यात आली आहे. या कारसाठी वेगळ्या मटेरियलचा वापर करण्यात आला आहे.