बाईक प्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली! नव्या फिचर्ससह Kawasaki Ninja 300 बाजारात

2023 Kawasaki Ninja 300 Price: बाईकप्रेमींसाठी कावासाकी इंडियाने 2023 मधलं नवं मॉडेल लाँच केलं आहे. नव्या फिचर्ससह कावासकीची बाईक बाजारात लाँच करण्यात आली आहे. 

| Jun 03, 2023, 17:25 PM IST
1/5

कावासाकी मोटर्सने ग्राहकांसाठी 2023 Kawasaki Ninja 300 ही आकर्षक बाईक अखेर लाँच केली आहे. यात 300 सीसी इंजिन असलेली ही बाईक तीन वेगवगेळ्या रंगात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

2/5

यात कँडी लाईम ग्रीन, लाइम ग्रीन आणि मॅटेलिक मूनडस्ट ग्रे अशा तीन रंगात ही बाईक मिळणार आहे. कंपनीने जुन्हा बाईकच्या तुलनेत नव्या Kawasaki Ninja 300 मध्ये अत्याधुनिक फिचर्स दिले आहेत. 

3/5

Kawasaki Ninja 300 ची शोरुम प्राईज 3 लाख 43 रुपये इतकी आहे. नव्या बाईकमध्ये बेस कलर लाईम ग्रीन ठेवण्यात आला आहे. यात ब्रॅक ग्राफिक्स आणि रेड हेडलाईट देण्यात आली आहे. बाईकच्या फ्यूएल टँकवरही आकर्षक ग्राफिक्स पाहिला मिळेल. 

4/5

या बाईकमध्ये कंपनीने 296 सीसी फोर स्ट्रोक पॅरलल ट्विन, लिक्विड कूल्ड 8 व्हॉल्व्ह इंजिन दिलं आहे. हे इंजिन 39PS ची पॉवर आणि 26.1 Nm टॉर्क जनरेट करते. चांगला अॅव्हरेज देण्यासाठी बाईकमध्ये हीट मॅनेजमेंट टेक्नोलॉजीही देण्यात आली आहे. 

5/5

Kawasaki Ninja 300 या बाईकची आणखी एक खासियत म्हणजे बाईकला रेसिंग तंत्रज्ञान असलेला स्लिपर क्लच देण्यात आला आहे. बॅक-टॉर्क लिमिटर आणि सेल्फ-सर्व्हो मेकॅनिझम दोन्ही एकाचवेळी काम करते.