Shukra Margi 2023 : शुक्र 4 सप्टेंबरला होणार मार्गी, 5 राशींच्या बँकेत असणार पैसाच पैसा

Shukra Margi 2023 : संपत्तीचा कारक शुक्र ग्रह  48 तासांनंतर कर्क राशीत मार्गी होणार आहे. शुक्र सध्या सिंह राशीत प्रतिगामी होणार आहे. यामुळे 5 राशींच्या आयुष्यात पैसाच पैसा असणार आहे. 

Sep 02, 2023, 12:03 PM IST

Shukra Margi 2023 : धन, वैभव आणि सुखाचा कारक शुक्र ग्रह जेव्हा जेव्हा आपली स्थिती बदलतो. याचा परिणाम 12 राशींवर होतो. सध्या शुक्र ग्रह सिंह राशीत असून तो कर्क राशीत प्रवेश करणार आहे. 

1/7

शुक्र गोचर हे 12 राशींच्या लोकांसाठी शुभ मानलं जातं. काही राशींच्या आयुष्यात धनसंपदा आणि प्रगती घेऊन येतो. 

2/7

येत्या 4 सप्टेंबर सोमवारी शुक्र ग्रह चंद्राच्या स्वामी रास आणि शुक्राची शत्रू रास कर्कमध्ये गोचर करणार आहे. 

3/7

धनु (Sagittarius Zodiac)

शुक्र मार्गीमुळे या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी मिळणार आहे. भविष्याशी संबंधित समस्या दूर नाहीसा होणार आहेत. अचानक धनलाभ होणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होणार आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. 

4/7

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांना शुक्र मार्गीमुळे कामाच्या ठिकाणी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे. तुमचा या काळात संपत्ती आणि सन्मान वाढणार आहे. कुटुंबाच्या गरजा तुम्ही पूर्ण करणार आहात. आउटसोर्सिंगमधून तुम्हाला नफा प्राप्त होणार आहे. परदेशातूनही उत्पन्न मिळण्याची संधी आहे. लव्ह पार्टनरसोबतचे नातं अधिक मजबूत होणार आहे. 

5/7

कन्या (Virgo Zodiac)

या राशीच्या लोकांचं समाजात नाव होणार आहे. व्यवसायात चमत्कार होणार आहे. तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे त्यातून तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. पैसे कमविण्यासाठी अनेक संधी लाभणार आहेत. नोकरदारांचं उत्पन्न वाढणार आहे. 

6/7

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शुक्र मार्गी करिअरच्या दृष्टीकोनातून सकारात्मक घडणार आहे. कामाच्या ठिकाणी बदल दिसणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत हा फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. नवीन नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. परदेशात कामाची संधी मिळण्याची शक्यता आहे. 

7/7

वृषभ (Taurus Zodiac)

या लोकांना कामाच्या ठिकाणी मेहनतीचं फळ मिळणार आहे. ऑफिसमध्ये आणि समाजात तुमचं कौतुक होणार आहे. तुमचं प्रमोशन होणार आहे. व्यवसायात नफा आणि यश प्राप्त होणार आहे. इतरांची मनं जिंकण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. कुटुंबातही आनंदाचं वातावरण असणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)