एशिया कप चॅम्पियन टीम इंडियावर पैशांची बरसात, तर श्रीलंकेलाही बंपर लॉटरी

Sri Lanka vs India Asia Cup 2023 Final : एशिया कप स्पर्धेत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 10 विकेट राखून पराभव केला. एशिया कप स्पर्धेच्या इतिहासातला श्रीलंकेचा ही सर्वात निचांक धावसंख्या ठरली आहे. विजेत्या भारतीय संघावंर पैशांची बरसात झाली आहे. तर उपविजेत्या श्रीलंकेलाही लॉटरी लागली आहे. 

| Sep 17, 2023, 23:17 PM IST
1/7

एशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेवर 10 विकेट ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाबरोबर भारताने तब्बल आठव्यांदा एशिया कपच जेतेपद मिळवलं.

2/7

एशिया कप जिंकणाऱ्या टीम इंडियावर पैशांची बरसात झाली आहे. टीम इंडियाला तब्बल 1.24 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. 

3/7

तर उपविजेत्या ठरलेल्या श्रीलंकेलाही बंपर लॉटरी लागली आहे. श्रीलंकेला जवळपास 62 लाख 31 हजार रुपये प्राईज मनी मिळाली आहे. 

4/7

अंतिम सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच ठरलेल्या मोहम्मद सिराजला चार लाख दहा हजार रुपयांचं बक्षिस मिळालं. ते त्याने लंकेच्या ग्राऊंड्समॅनला डोनेट केले.

5/7

स्पर्धेत नऊ विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवला मॅन ऑफ द सीरिजचा खिताब मिळाला. त्याला 12 लाख 46 हजार रुपये बक्षीस म्हणून मिळाले.

6/7

श्रीलंका क्रिकेटच्या ग्राऊंड स्टाफलाही 50 हजार डॉलरचं बक्षीस देण्यात आलं. भारतीय रुपयात 41 लाख 54 हजार रुपयांचं कॅश प्राईज मिळालं. 

7/7

भारतीय संघ आठव्यांदा एशिया चॅम्पियन ठरला आहे. याआधी 1984, 1988, 1990, 1995, 2010. 2016 आणि 2018 आणि एशिया कपचं जेतेपद पटकावलं होतं.