पाऊले चालती... आज माऊलींची पालखी दिवेघाटात; तुकोबारायांची पालखी कुठवर?

Ashadhi ekadashi 2024 : याच विठ्ठलभेटीची आस मनी बाळगून हजारो- लाखो वारकरी आता टप्प्याटप्प्यानं पंढरपुरच्या दिशेनं मार्गस्थ होताना दिसत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्याही मजल दरमजल करत प्रवासाचा पुढील टप्पा गाठत आहेत.   

Jul 02, 2024, 10:02 AM IST

Ashadhi ekadashi 2024 : वर्षभराच्या मेहनतीनंतर प्रत्येक वारकऱ्याला ओढ असते ती म्हणजे पंढरपुरात जाऊन विठ्ठलाची भेट घेण्याची. 

1/8

अबालवृद्ध

Ashadhi ekadashi 2024 wari saint dnyaneshwar saint tukaram maharaj Palkhi photos

सानथोर, अबालवृद्ध... इथं सारे एक! पंढपूरच्या विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांची मन प्रसन्न करणारी छायाचित्र....(छाया सौजन्य- प्रविण ठुबे)  

2/8

ज्ञानेश्वर माऊली

Ashadhi ekadashi 2024 wari saint dnyaneshwar saint tukaram maharaj Palkhi photos

ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. तुकोबांच्या पालखीचा मुक्काम मंगळवारी लोणी काळभोरला असेल, तर माऊलींची पालखी दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करत सासवड मुक्कामी पोहोचणार आहे.   

3/8

वैष्णवांचा मेळा

Ashadhi ekadashi 2024 wari saint dnyaneshwar saint tukaram maharaj Palkhi photos

पंढरीच्या दिशेनं निघालेला वैष्णवांचा मेळा पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम उरकून पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला आहे. पहाटेची आरती झाल्यानंतर संतांच्या पादुका फुलांनी सजवलेल्या रथावर ठेवण्यात आल्या. 

4/8

वारकरी

Ashadhi ekadashi 2024 wari saint dnyaneshwar saint tukaram maharaj Palkhi photos

पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले वारकरी आणि त्यांना निरोप देण्यासाठी गोळा झालेले पुणेकर याप्रसंगी भक्ती रसात न्हाऊन निघाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी पुण्यात दाखल झाला होता. (छाया सौजन्य- प्रविण ठुबे)

5/8

दिंड्या

Ashadhi ekadashi 2024 wari saint dnyaneshwar saint tukaram maharaj Palkhi photos

पालखी सोहळ्यात दाखल झालेल्या हजारो दिंड्या शहराच्या विविध भागात विखुरल्या होत्या. त्या मंगळवारी पुन्हा एकवटल्या आणि पुढच्या प्रवासासाठी रवाना झाल्या. (छाया सौजन्य- प्रविण ठुबे) 

6/8

वारी

Ashadhi ekadashi 2024 wari saint dnyaneshwar saint tukaram maharaj Palkhi photos

पुण्यनगरीत दोन दिवस एकत्र घालवल्यानंतर हडपसरच्या नाक्यावर दोन्ही पालख्या दोन वेगळ्या मार्गांनी पंढरपूर कडे रवाना होतात असं दरवर्षीचं वेळापत्रक. (छाया सौजन्य- प्रविण ठुबे)  

7/8

ज्ञानोबा

Ashadhi ekadashi 2024 wari saint dnyaneshwar saint tukaram maharaj Palkhi photos

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पुढचा मुक्काम लोणी काळभोरला असणार आहे. तर ज्ञानोबांची पालखी दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करत सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. (छाया सौजन्य- प्रविण ठुबे)  

8/8

दिवेघाटाचा प्रवास

Ashadhi ekadashi 2024 wari saint dnyaneshwar saint tukaram maharaj Palkhi photos

दरम्यान, हिरवाईने नटलेल्या दिवे घाटाचा प्रवास वारकऱ्यांसाठी एक पर्वणी असतो, यंदाही हीच पर्वणी अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी हा घाट ओलांडणार आहेत. ज्ञानोबा तुकोबांचा नामघोष आणि विठू नामाचा गजर करत वारकऱ्यांचा भक्ती सागर पुढच्या गावी जाऊन विसावतो. (छाया सौजन्य- प्रविण ठुबे)