Saving Tips: पगार होताच करा असं काम की होईल हजारोंची बचत

Saving: दीर्घकालीन बचतीचा उद्देश शिक्षण, कार किंवा घर खरेदी करणे, लग्न करणे इत्यादी असू शकतो. याशिवाय वाचवलेले पैसे कोणत्याही आजाराच्या उपचारासाठीही वापरले जाऊ शकतात.

Dec 21, 2022, 18:41 PM IST
1/5

Saving Tips

Save From Salary: पगार झाला की झाला लगेच संपतो असं काही जणांचं म्हणणं असतं. काही जणांच्या मते पगार झाला की प्रथम मासिक खर्च करावा आणि नंतर बचत करावी. पण या विचारामुळे महिन्याच्या शेवटीही बचत करता येत नाही. आम्ही तुम्हाला नवीन वर्षात बचत करण्याच्या टिप्स सांगणार आहोत.

2/5

Saving Tips

बचत हा उत्पन्नाचा असा भाग आहे जो की चालू खर्चावर खर्च केला जात नाही. हा पैसा भविष्यातील वापरासाठी बाजूला ठेवला जातो. तसेच आपत्कालीन परिस्थिती किंवा ज्या उद्देशासाठी बचत केली जाते त्याकरिता वापरला जातो.

3/5

Saving Tips

आपण पैसे का वाचवावे? हा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो. पण बचत करून त्याचा उपयोग भविष्यातील अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जाऊ शकतो. बचतीमुळे अल्पावधीत उद्दिष्टे पूर्ण केली जाऊ शकतो. 

4/5

Saving Tips

दीर्घकालीन बचतीतून शिक्षण, कार किंवा घर खरेदी करणे, लग्नासारखा खर्च करू शकतो. याशिवाय वाचवलेले पैसे कोणत्याही वैद्यकीय उपचारासाठीही वापरले जाऊ शकतात.

5/5

Saving Tips

पगार येताच तुमच्या बचतीचा काही भाग बाजूला ठेवला पाहिजे. त्यामुळे दर महिन्याला बचत करण्याची सवय लागेल आणि एक रक्कमही वाचेल. पगाराच्या किमान 10-15% बचत करणे आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही दरमहा हजारो रुपयांची बचत करू शकाल.