पुण्याच्या उजनी जलाशयावर परदेशी पाहुण्याचं आगमन; सातासमुद्रापार आले फ्लेमिंगो

सातसमुद्रापार करुन आले परदेशी पाहुणे आले आहेत. पुण्याच्या उजनी जलाशयावर फ्लेमिंगो पक्षांचे आगमन झाले आहे. 

Dec 02, 2023, 20:15 PM IST

Pune Ujani Dam Flamingo : पुण्याच्या उजनी जलाशयावर परदेशी पाहुण्याचं आगमन झाले आहे. हजारो किलोमीटरचा प्रवास करून शेकडो फ्लेमिंगो पक्षी उजनी जलाशय परिसरात दाखल झाले आहेत. उजनी जलाशय परिसरात विहंगम दृष्य पहायला मिळत आहे. 

1/7

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत उजनी जलाशयात फ्लेमिंगो पक्षाचे आगमन झाले. 

2/7

दरवर्षी नोव्हेंबर ते मार्चदरम्यान प्लेमिंगो भारतामध्ये येऊन वेगवेगळया ठिकाणी वास्तव्य करतात.   

3/7

मध्य आशिया तसेच ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, केनियातील सरोवरांमध्ये  अन्नाची कमतरता भासते. यामुळे अन्नाच्या शोधात फ्लेमिंगो मोठ्या संख्येने स्थलांतर करतात.  

4/7

 या पक्षांच्या जलक्रीडा पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यासह नगर, सोलापूर व राज्यातील विविध ठिकाणावरून पक्षी प्रेमी व पक्षी अभ्यासक आवर्जून भेट देतात.  

5/7

विस्तीर्ण जलाशय, खाद्यान्नची मुबलकता, पाणथळ जागा आशा वास्तवास उपयोगी गोष्टी असल्यामुळे फ्लेमिंगो पक्षी येथे अधिक काळ वसाहत करतात. 

6/7

नोव्हेंबर ते मार्च या पक्षांचा उजनी जलपात्रामध्ये मुक्काम असतो. 

7/7

मध्य आशिया सह ऑस्ट्रेलिया व आफ्रिका खंडातून हजारो किलोमिटर चा प्रवास करत हे पक्षी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात उजनी जलाशयामध्ये येतात.