या ५ शूर महिलांनी भारताची मान उंचावली

Jan 15, 2018, 23:30 PM IST
1/6

भारतीय सेना आज ७०वा आर्मी दिवस साजरा करत आहे. या प्रसंगी आम्ही तुम्हाला भारताच्या अशा महिला अधिकाऱ्यांबाबत माहिती देणार आहोत, ज्यांनी भारताचं नाव जगात उंचावलं. 

2/6

पुनीत अरोरा- पुनीत अरोरा या भारताच्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी भारतीय सशस्त्र बलाची दुसरी सगळ्यात मोठी रॅकिंग लेफ्टनंट जनरलची पोस्ट सांभाळली. पुनीत अरोरा भारतीय नौसेनेच्या पहिल्या महिला व्हाईस अॅडमिरलही होत्या. 

3/6

पद्मावती बंडोपाध्याय- पद्मावती बंडोपाध्याय या भारतीय वायूसेनेच्या पहिल्या महिला एअर मार्शल होत्या. 

4/6

दिव्या अजित कुमार- 'स्वॉर्ड ऑफ ऑनर'चा किताब मिळवणाऱ्या दिव्या अजित कुमार या पहिल्या महिला कॅडेट होत्या. 

5/6

अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग या भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानाच्या पहिल्या पायलट होत्या. 

6/6

गुंजन सक्सेना- गुंजन सक्सेना या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला अधिकारी होत्या ज्या युद्ध क्षेत्रात गेल्या. गुंजन सक्सेनांचा उल्लेख कारगील गर्ल म्हणूनही केला जातो.