स्वतःचे बुलेटप्रूफ जॅकेट घेऊन फिरतो हा प्राणी, गोळ्या झाडल्या तरी राहतो सुरक्षित!

Armadillo : आर्माडिलो हा प्राणी त्याच्या विशिष्ट रचनेमुळे ओळखला जातो. या प्राण्याच्या पाठीवर टणक असे कवच असते. 

Dec 27, 2023, 17:04 PM IST

Armadillo Bulletproof Animal : या पृथ्वी तलावर लाखो जीव अस्तित्वात आहेत. प्रत्येक जीव हा वेगळा आहे. प्रत्येकाची रचना वेगळी असते. असाच एक जीव आहे ज्याची रचना बुलेट प्रुफ जॅकेट प्रमाणे आहे. आर्माडिलो असे या प्राण्याचे नाव आहे. 

1/7

पृथ्वीवर एक बुलेट प्रुफ प्राणी अस्तित्वात आहे. या प्राण्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या तरी त्याला काहीच होत नाही.  

2/7

आर्माडिलोच्या एका अंड्यातून चार जीव जन्माला येतात.  हे प्राणी दिवसभर आराम करतात आणि रात्री शिकारीसाठी बाहेर पडतात.  

3/7

आर्माडिलो या प्राण्याच्या 20 प्रजाती अस्तित्वात आहेत. लॅटिन अमेरिकेत हा प्राणी आढळतो.

4/7

खवल्या मांजर सारखं शरीर असणारा प्राणी आहे. याचे तोंड हे सुसरीसारखं लांबुळकं असतं.  

5/7

 आर्माडिलो या प्राण्याच्या पाठीवर असलेले कवच इतकं मजबूत असतं की अगदी बंदुकीची गोळी झाडली तरी काहीच परिणाम होत नाही. 

6/7

आर्माडिलो या प्राण्याच्या पाठीवर कासवांसारखं टणक कवच असतं. या प्राण्याचे वैज्ञानिक नाव डेसीपोडिडे (Desipodidae) असे आहे. 

7/7

 या बुलेट प्रुफ प्राण्याचे नाव आहे. हा प्राणी स्वतःचे संरक्षण स्वत: करु शकतो. तशा प्रकारची रचना या प्राण्याची आहे.