Reality Show मध्ये अपयशी ठरलेल्या अरिजीतची गाणी आज लाखो चाहत्यांच्या ओठांवर...

Arijit Singh Birthday : मनोरंजन क्षेत्रात असे अनेक आवाज आहेत, जे प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिले आहेत. याच आवाजांपैकी एक म्हणजे अरिजित सिंह. अरिजित सिंह हा एक प्रसिद्ध बॉलिवूड गायक आहे. त्याने गायलेल्या अनेक गाण्यांना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. आजच्या युगात अरिजित सिंह हे रोमँटिक गाण्यांचे दुसरे नाव बनले आहे. याचपार्श्वभूमीवर अरिजित सिंह च्या वाढदिवसानिमित्ताने प्रसिद्ध रोमँटिक गाणी जाणून घेऊया..   

Apr 25, 2023, 10:42 AM IST
1/7

गेरुआ...

दिलवाले या चित्रपटातील लोकप्रिय जोडी शाहरुख खान आणि काजोल देवगण असलेल्या या गाण्यात अरिजित सिंगच्या आवाजाने आणखी भावना जोडल्या आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने खूप वर्षांनी काजोल आणि शाहरुखला पडद्यावर रोमान्स करताना पहायला मिळालं होतं.  

2/7

मस्त मगन...

2 स्टेट्स या चित्रपटातील आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर वर मस्त मगन.. हे गाणे अरिजित सिंगच्या सुरेल आवाजात आहे. बऱ्याच लोकांनी हे गाणं स्वतःच्या कॉलर ट्यूनला लावलं होतं.  

3/7

तेरे प्यार में...

अरिजित सिंगच्या डिस्कोग्राफीमधील नवीनतम रोमँटिक ट्रॅक, तेरे प्यार में.... हा स्पेनमधील श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रित केलेले गाणं आहे.

4/7

केसरिया...

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रित केलेले हे गाणे त्याच्या टीझरमुळे झटपट हिट झाले. केसरिया 2022 मधील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक बनले.

5/7

अगर तुम साथ हो...

तमाशा या चित्रपटातील दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांचे अगर तुम साथ हो...हे गाणे आपल्या प्रेयसीसोबत असण्याची भावना व्यक्त करते. अरिजीतने हे गाणे अगदी मनापासून गायले आहे. 

6/7

तुम ही हो...

आशिकी 2 या चित्रपटातील अरिजीची गाणी अधिक भावूक आणि हृदयस्पर्शी करणारी गाणी आहेत.  तुम ही हो... हे गाणं अनेकांनी आपल्या आवडत्या व्यक्तींसाठी डेडिकेट केलं होतं. 

7/7

हमदर्द ...

'एक व्हिलन' या चित्रपटातील श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या नात्यावर हे 'हमदर्द' गाण चित्रित केले गेले. अरिजित सिंगच्या सर्वोत्कृष्ट रोमँटिक गाण्यांपैकी एक आहे.