'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटासाठी अंकिता लोखंडेने घेतलं इतकं मानधन, निर्मात्याने केला खुलासा

Mar 28, 2024, 20:29 PM IST
1/10

'संस्कारी सून' घराघरात ओळख

Ankita lokhande Did Not Charge Any Fees For Swatantrya Veer Savarkar know the reason behind

'पवित्र  रिश्ता' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. छोट्या पडद्यावरील 'संस्कारी सून' म्हणून तिने ओळख निर्माण केली आहे.   

2/10

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटामुळे चर्चेत

Ankita lokhande Did Not Charge Any Fees For Swatantrya Veer Savarkar know the reason behind

काही दिवसांपूर्वी अंकिता ही बिग बॉस हिंदीच्या 17 व्या पर्वात झळकली. या कार्यक्रमामुळे ती प्रसिद्धीझोतात आली. सध्या अंकिता 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.   

3/10

प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद

Ankita lokhande Did Not Charge Any Fees For Swatantrya Veer Savarkar know the reason behind

या चित्रपटात अंकिता ही वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

4/10

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटासाठी किती मानधन घेतलं?

Ankita lokhande Did Not Charge Any Fees For Swatantrya Veer Savarkar know the reason behind

अंकिता लोखंडेने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं? याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. याबद्दल चित्रपटाच्या निर्मात्यांनी खुलासा केला आहे.   

5/10

चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला खुलासा

Ankita lokhande Did Not Charge Any Fees For Swatantrya Veer Savarkar know the reason behind

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची निर्माते संदीप सिंग इंडिया टुडेला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अंकिताला दिलेल्या मानधनाचा खुलासा केला आहे.   

6/10

माझ्याबरोबर काम करण्याच कोणीही इच्छुक नव्हते - संदीप सिंग

Ankita lokhande Did Not Charge Any Fees For Swatantrya Veer Savarkar know the reason behind

"ज्यावेळी मी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट करायला घेतला तेव्हा हा चित्रपट करण्यासाठी माझ्याबरोबर कोणीही इच्छुक नव्हते. कारम मी खूप मीडिया ट्रायलमधून जात होतो."   

7/10

ती या चित्रपटात असावी, अशी मनापासून इच्छा

Ankita lokhande Did Not Charge Any Fees For Swatantrya Veer Savarkar know the reason behind

"मी अंकिताला कधीच याबद्दल सांगितल नव्हतं. पण तिने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात यमुनाबाईंची भूमिका साकारावी, असं मला मनापासून वाटत होतं." 

8/10

मी हा चित्रपट करण्यासाठी तयार, पण माझी ही अट

Ankita lokhande Did Not Charge Any Fees For Swatantrya Veer Savarkar know the reason behind

यानंतर अंकिताने हा चित्रपट करण्यासाठी माझ्यासमोर एक अट ठेवली होती. त्यावेळी ती म्हणालेली "मी हा चित्रपट करण्यासाठी तयार आहे, पण यासाठी माझी एक अट आहे. मी या चित्रपटासाठी तुमच्याकडून एकही रुपया घेणार नाही."  

9/10

तू माझ्या सगळ्या चित्रपटांत काम करणार

Ankita lokhande Did Not Charge Any Fees For Swatantrya Veer Savarkar know the reason behind

"मी तुमच्याकडून कोणत्याही भूमिकेसाठी कधीही पैसे घेऊ शकत नाही", असेही अंकिताने त्यावेळी म्हटले होते. यावर मी तिला मग तू माझ्या सगळ्या चित्रपटांत काम करणार आहेस.” असे म्हटले होते. 

10/10

दिग्दर्शन, सहलेखन व सहनिर्मिती रणदीप हुड्डाची

Ankita lokhande Did Not Charge Any Fees For Swatantrya Veer Savarkar know the reason behind

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचं दिग्दर्शन, सहलेखन व सहनिर्मिती रणदीप हुड्डाने केले आहे. या चित्रपटात अमित सियाल, राजेश खेरा, लोकेश मित्तल, ब्रजेश झा, संतोष ओझा, राहुल कुलकर्णी, मृणाल दत्त, संजय शर्मा, सल यूसुफ हे कलाकार झळकत आहे.