अंबानी फॅमिलीमध्ये प्री वेडिंगचं नाव ठेवलंय La Vite E Un Viaggio... याचा नेमका अर्थ काय?

Ambani familys pre wedding : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट दुसऱ्यांदा प्री-वेडिंग फंक्शन सेलिब्रेट करणार आहेत. या जोडप्याने यापूर्वी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग सोहळा साजरा केला होता. 

Saurabh Talekar | May 29, 2024, 21:52 PM IST
1/7

दुसरी प्री-वेडिंग

जामनगरमध्ये झालेल्या या प्री-वेडिंगला जगभरातील अनेक दिग्गज आले होते. आता 29 मे रोजी इटलीहून निघणाऱ्या आलिशान क्रूझवर दुसऱ्यांदा प्री-वेडिंग होणार आहे.

2/7

इटली टू स्वित्झर्लंड

सेलिब्रेशनमध्ये जगभरातील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. इटलीपासून सुरू झालेला हा सोहळा 1 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये पूर्ण होणार आहे.

3/7

सोहळ्याला खास नाव

तुम्हाला माहिती नसेल तर अंबानींच्या या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याला खास नाव देण्यात आलंय. त्याचं नाव... ला विटे ई अन विएजिओ (La Vite E Un Viaggio)

4/7

La Vite E Un Viaggio

दातखिळी बसेल असं हे नाव ऐकून तुम्हीही चकित झाला असाल, पण हे इटालियन नाव आहे. या La Vite E Un Viaggio याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या

5/7

जीवन एक प्रवास

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या आमंत्रण पत्रिकेवर 'ला विटे ई अन विएजिओ' लिहिलेलं आहे. याचा अर्थ 'जीवन एक प्रवास आहे' असा होतो.

6/7

प्री-वेडिंग फंक्शन

प्री-वेडिंग फंक्शन 29 मे रोजी क्रूझ जहाजावर वेलकम लंचने सुरू झालं. त्यानंतर संध्याकाळी स्टोरी नाईट होईल. त्यानंतर रोमन हॉलिडे या थीमवर उत्सव साजरा केला जाईल.

7/7

लग्न कधी?

दरम्यान, 29 मे ते 1 जून याकाळात फ्रान्समध्ये अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग पार पडणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट 12 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.