अलीने सांगितले हार्दिकच्या Ex पत्नी नताशासोबतच्या ब्रेकअपचे कारण? म्हणाला कुटुंबासोबत...

अली गोनी हार्दिकच्या Ex पत्नी नताशासोबत ब्रेकअप का केला होता याबद्दल खुलासा केला आहे. काय म्हणाला अली गोनी? जाणून घ्या सविस्तर

| Aug 28, 2024, 14:15 PM IST
1/6

ब्रेकअपचं कारण

खूप दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. आता काही वर्षांनंतर अलीने नताशासोबतच्या ब्रेकअपचे कारण उघड केले आहे. 

2/6

अलीचा खुलासा

अली गोनी अलीकडेच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये पाहुणा बनला होता. जिथे त्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले होते. 

3/6

नाते संबंध

यावेळी अलीने त्याच्या पूर्वीच्या नात्याबद्दल सांगितले. त्यानंतर जस्मिनच्या आधीचे त्याचे संबंध चांगले झाले नव्हते. कारण तो त्याच्या गर्लफ्रेंडच्या मागण्या मान्य करू शकत नव्हता. 

4/6

गर्लफ्रेंडची अट

अली म्हणाला की, त्याच्या Ex गर्लफ्रेंडने लग्नानंतर कुटुंबासोबत राहणार नाही अशी अट ठेवली होती. पण अली आपल्या कुटुंबाला सोडू शकत नव्हता. त्यामुळेच त्यांचे नाते तुटले. 

5/6

नताशासोबत रिलेशनशिप

अलीने नताशाचे नाव घेतले नाही. परंतु चाहत्यांना असा विश्वास आहे की तो तिच्याबद्दल बोलत आहे. कारण जस्मिनच्या आधी अली नताशासोबत रिलेशनशिपमध्ये होता. 

6/6

एकुलता एक मुलगा

माझ्या कुटुंबात मी एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला सोबत घेईन. मी त्यांना सोडू शकत नाही.